33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeमुंबईCorona Effect : आर्थिक वर्ष 30 जून, कालावधी वाढविला

Corona Effect : आर्थिक वर्ष 30 जून, कालावधी वाढविला

Corona Effect : सगळे आर्थिक व्यवहार लांबणीवर

टीम लय भारी

मुंबई : जगभरात ‘कोरोना’च्या विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही हा विषाणू हातपाय पसरू लागला आहे. ‘कोरोना’च्या या परिणामामुळे ( Corona effect ) ‘भारतीय रिझर्व्ह बँके’ने ( RBI ) महत्वाचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्षाचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे.

आरबीआयच्या या निर्णयामुळे ३१ मार्च अखेर कराव्या लागणाऱ्या आर्थिक व्यवहारांना आता तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. आरबीआयच्या केंद्रीय मंडळाची नुकतीच नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीत चालू आर्थिक वर्ष ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला पुढील आर्थिक वर्षाचा कालावधी हा १ जुलै २०२० ते ३१ मार्च २०२१ असा करण्यात आला आहे. ‘कोरोना’च्या संकटामुळे या दोन्ही आर्थिक वर्षांपुरताच हा बदल केला आहे.

कर्ज हप्ते फेडण्यासाठी मुदतवाढ द्या : अशोक चव्हाण

‘कोरोना’मुळे ( Corona Effect ) सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. लोकांना कामावर जाता येत नाही. अशा परिस्थितीत लोकांकडून विविध कर्जाचे हप्ते वसूल करणे योग्य होणार नाही. त्यासाठी कर्ज फेडण्यासाठीच्या हप्त्यांना मुदतवाढ देण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळविण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Corona पसरविणाऱ्या वटवाघळाला समजून घ्या ( डॉ. महेश गायकवाड )

Coronavirus Update : साताऱ्यात 2 रूग्ण आढळले

WarAgainstVirus : शरद पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेही उत्कृष्ट काम करीत आहेत : जितेंद्र आव्हाड

WHO : कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी