29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeआरोग्यCoronavirus Update : साताऱ्यात 2 रूग्ण आढळले

Coronavirus Update : साताऱ्यात 2 रूग्ण आढळले

Coronavirus Update : सातारा – सांगलीकरांची चिंता वाढली

टीम लय भारी

सातारा : सोमवारी सायंकाळी साताऱ्यात १ ‘कोरोना’ग्रस्त रूग्ण आढळला होता. त्यानंतर रात्री उशिरा त्यात आणखी एकजणाची भर ( Coronavirus Update ) पडली. त्यामुळे साताऱ्यातील ‘कोरोना’ग्रस्तांची एकूण संख्या २ एवढी झाली आहे.

साताऱ्यात नव्याने आढळलेला रूग्ण कॅलिफोर्नियातून आलेला होता. त्याचे वय ६३ आहे. ताप व घसा दुखत असल्यामुळे त्याला काही दिवसांपूर्वी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रूग्णाचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला ‘कोरोना’ची ( Coronavirus Update ) लागण झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

त्या अगोदर खंडाळा येथील ४५ वर्षीय एका महिलेला ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आले होते. या महिलेला रविवारी रात्री उशिरा रूग्णालयात दाखल केले होते. सोमवारी तिचा अहवाल प्राप्त झाला. त्यात ती ‘कोरोना’बाधित असल्याचे आढळून आले आहे. ही महिला दुबईवरून आली होती.

सांगलीत चार रूग्ण आढळले

साताऱ्यालगत असलेल्या सांगली जिल्ह्यातही ‘कोरोना’ची ( Corona Update ) लागण झालेले चार रूग्ण आढळले आहेत. हे चौघेही एकाच कुटुंबातील इस्लामपुरचे आहेत. ते १४ मार्च रोजी सौदी अरेबियाहून आले होते. परदेशातून आल्यामुळे त्यांना महसूल प्रशासनाने ‘होम कॉरन्टाईन’च्या सुचना दिल्या होत्या. तरीही या चौघांनी बेजबाबदारपणा दाखवला. ते बिनधिक्कतपणे बाहेर फिरत होते. त्यामुळे त्यांना सरकारच्या वतीने दोन वेळा नोटीस पाठविण्यात आली. त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर हे चौघेजण आजारी पडले. त्यामुळे त्यांना मिरज येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘कोरोना’चे संशयित म्हणून त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठविले होते. त्या चौघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या चौघांपैकी १ महिला व तीन पुरूष आहेत. या चौघांवरही आता उपचार सुरू आहेत.

एकाच दिवसांत महाराष्ट्रात २४ रुग्ण आढळले

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची ( Coronavirus Update ) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोमवारी सकाळी १५ नवीन रूग्ण आढळले होते. त्यानंतर रात्री आणखी ९ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकाच दिवसात २४ ‘कोरोना’ग्रस्त रूग्ण आढळले आहेत.

सकाळी मुंबईत ११ जण, तर पुणे, ठाणे, वसई – विरार व आणि नवी मुंबईत प्रत्येकी एक रूग्ण आढळला. मुंबई व परिसरात आढळलेल्या १४ नवीन रूग्णांपैकी ९ जणांना संसर्गातून ‘कोरोना’ची लागण झाली आहे. हे नऊ जण परदेशातून आलेल्या ‘कोरोना’ग्रस्तांचे निकटचे नातलग आहेत. तर इतर पाच जण दुबई, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या देशातून आले आहेत.

रात्री आढळलेल्या ९ जणांपैकी सांगलीचे चार, तर साताऱ्याचे दोनजण आहेत. कल्याण – डोंबिवली, मुंबई, ठाणे येथील प्रत्येकी एकजण आहे. कल्याण डोंबिवलीचा रूग्ण पेरू येथून, तर मुंबईचा रूग्ण अबूधाबी येथून आला होता. ठाण्याच्या रूग्णाला संपर्कातून ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०१

दरम्यान, आज सकाळी आणखी तीन नवे रूग्ण ( Coronavirus Update ) आढळून आले आहेत. त्यामुळे रूग्णांची संख्या १०१ एवढी झाली आहे.

ताज्या अपडेट मिळविण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Corona पसरविणाऱ्या वटवाघळाला समजून घ्या ( डॉ. महेश गायकवाड )

WHO : ‘कोरोना’ बचावासाठी हे करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी