31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबई'कोरोना'ची लस घेणाऱ्यांना जडतोय नवा आजार

‘कोरोना’ची लस घेणाऱ्यांना जडतोय नवा आजार

मृगा वर्तक : टीम लय भारी

मुंबई :-  कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असताना सरकारकडून अतिशय वेगाने लसीकरण सुद्धा सुरू झालेले आहे. इतर अनेक आजारांच्या लसीसारखी कोरोनाच्या लसींची चाचणी long term testing च्या आधारे घेतली गेली नाही. तरीही या लसींचे फार मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत नाहीत हे सिद्ध झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लड आणि भारतात गुलीयन बेरी सिंड्रोमचे 11 रुग्ण आढळून आलेले आहेत (Corona vaccine is a new disease).

गुलीयन बेरी सिंड्रोम हा सर्वात प्रथम 2009 मध्ये आलेल्या स्वाईन फ्लूच्या साथीमध्ये आढळून आला. स्वाईन फ्लू झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये या सिंड्रोमची लक्षणे दिसली होती. सध्याच्या काळात कोविशील्ड लस घेतल्यानंतर भारत व इंग्लंड मधील एकूण 11 जणांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत (At present, a total of 11 people in India and England have been diagnosed with the disease after receiving the Covishield vaccine).

Corona vaccine is a new disease
कोरोना लस

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

भाजपच्या आंदोलनावर अमोल मिटकरी, रूपाली चाकणकर यांचे टीकास्त्र

तसेच एकट्या केरळ मध्ये 7 रुग्ण आढळून आलेले आहेत (7 patients have been found in Kerala). आतापर्यंत 1.2 दशलक्ष लोकांना ऑक्सफर्ड-अस्त्रजेनेका म्हणजेच कॉविशील्ड लस दिली गेली त्यातून फक्त 11 प्रकरणे समोर आल्याने इतका चिंतेचा विषय नसल्याचे सांगण्यात येते.

गुलीयन बेरी सिंड्रोम म्हणजे काय?

गुलीयन बेरी सिंड्रोम हा आजार बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे साधारणपणे होतो (Guillain Barr syndrome is a disease caused by a bacterial infection). ज्यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते. हा एक प्रकारचा नुरॉलॉजीकल सिंड्रोम आहे. जो मज्जासंस्था व नसांवर परिणाम करतो, परिणामी थकवा येणे, स्नायूंच्या मध्ये दुखणे अशी लक्षणे दिसून येतात.

कोरोना मेला, जनता बेफिकीर, पुढारी मोकाट

Covid-19: ICMR study has good news .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/83826779.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

Corona vaccine is a new disease
कोरोना लस

गुलीयन बेरी सिंड्रोमची लक्षणे

  • चालण्यात किंवा बोलण्यात अडचण
  • डोळे दुखणे व जळजळणे
  • अशक्तपणा व खाण्यात अडचण
  • पाय दुखणे
  • स्नायूंमध्ये टोचणे
  • शरीरात पेटके येणे
  • धाप लागणे
  • बोटांमध्ये, गुढग्यांमध्ये व मनगटात दुखणे
  • रक्तदाब असंतुलित राहणे

इत्यादी लक्षणे असल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नुरॉलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोकच्या माहितीनुसार हा आजार जीवघेणा नसला तरी काही औषधे देऊन आजाराची तीव्रता कमी करता येते. हा आजार नक्की कोणत्या माणसांना होतो यावर संशोधन अजून सुरू आहे. परंतु कोविशील्ड लस घेतल्यानंतर आठवडाभर नागरिकांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे (Citizens need to take care of their health for a week after receiving the Covishield vaccine).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी