30 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeमुंबईएकनाथ शिंदे आयोजित दहिहंडी उत्सवाला प्रियकरासोबत आली रकुल प्रीत

एकनाथ शिंदे आयोजित दहिहंडी उत्सवाला प्रियकरासोबत आली रकुल प्रीत

गुरुवारी दहीहंडी साजरी होत असताना सिने कलाकारांनीही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली. हिंदी अभिनेत्री राकुल प्रीतनं आपला प्रियकर निर्माता जॅकी भगनानीसोबत ठाण्यातील दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनंही दुसऱ्या दहीहंडी उत्सवात नृत्य सादर केले.

कोरोनातील दोन वर्षात दहीहंडी साजरी करताना सरकारकडून बऱ्याच नियमांची सक्ती करण्यात आली होती. कोरोनाच्या सावटापासून दूर येताच आता राज्यभरात दणक्यात दहीहंडी उत्सव सुरू झाला आहे. पूर्वीप्रमाणे आता सिने कलाकार दहीहंडी उत्सवात हजेरी लावत असल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by JACKKY BHAGNANI (@jackkybhagnani)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई आणि ठाणे परिसरातील दहीहंडी उत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जातीने लक्ष घालून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोजित ठाण्यातील दहीहंडी उत्सवात सायंकाळच्या दरम्यान अभिनेत्री राकुल प्रीत आणि जॅकी भगनानी हजर राहिले. राकुल प्रीतनं व्यासपीठाबाहेरील फॅन्सची मागणी लक्षात घेत गर्दीत जवळ जात त्यांच्यासोबत सेल्फी काढला. राकुलची नम्रता पाहून उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
हे सुद्धा वाचा 

नाव बदलल्याने देशाची परिस्थिती बदलणार का?
अभिनेत्री प्राजक्ता शिंदे म्हणते, तुच तुझ्या आयुष्याचा ‘ड्रायव्हर’
बोगस ओएसडी अधिकाऱ्याच्या कारनाम्याने मुख्यमंत्री कार्यालय कोमात

 अभिनेते सोनाली कुलकर्णीनंही दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. सोनालीने प्रसिद्ध गाण्यांवरती ठेका धरत उपस्थितांची मन जिंकली. दहीहंडी उत्सवाचे फोटो सोनालीनं इंस्टाग्रामवरही पोस्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी