28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमुंबईधनंजय मुंडे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला आज भेट देणार

धनंजय मुंडे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला आज भेट देणार

टीम लय भारी

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीत सामाजिक न्याय विभागाची तीन वसतिगृहे आहेत. एक मुलींचे, दोन मुलांची. या वसतिगृहात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले विद्यार्थी राहतात. दहावी, बारावीमध्ये घसघशीत गुण मिळवून हे विद्यार्थी वसतिगृहात गुणवत्तेनुसार प्रवेश मिळवतात. मुंबईतील व्हिजेटीआयपासून ते विद्यापीठाच्या विविध विभागात ते शिक्षण घेतात. अशा या अत्यंत गरीब, परंतु गुणवान विद्यार्थ्यांना निवास पुरविण्याची सेवा गेली कित्येक वर्षे ही तिन्ही वसतिगृहे करीत आली आहेत. गुणवंतांचा खजिना असलेल्या या वसतिगृहाला नवे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे मंगळवारी सायंकाळी भेट देणार आहेत.

दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाला शरद पवार व मुंडे एकत्रितपणे भेट देणार आहेत. त्यानंतर मुंडे वरळी वसतिगृहात जातील. यावेळी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. विद्यार्थ्यांच्या समस्याही ते यावेळी ऐकून घेणार आहेत. विद्यार्थी राहात असलेली वसतिगृहाची इमारत अत्यंत जुनाट आहे. ब्रिटीशकालीन या इमारतीची अनेकदा डागडुजी करण्यात आली आहे. तरीही बांधकामविषयी काही समस्या असतील तर मुंडे ऐकून घेणार आहेत.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात येतात. यामध्ये निवास, भोजन, बिछाना, कॉट, निर्वाह भत्ता यांचा समावेश आहे. परंतु हे साहित्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून बऱ्याचदा दुय्यम दर्जाचे साहित्य दिले जाते. भोजन बेचव व पौष्टीक असते. अभ्यास साहित्य उशिरा दिले जाते. निर्वाह भत्ता उशिरा दिला जातो. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. वसतिगृहाचे गृहपाल त्रास देतात. अशा अनेकविध समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत असतात. अशा काही समस्या विद्यार्थ्यांना असतील तर त्या सुद्धा मुंडे ऐकून घेणार आहेत.

स्वतःहून वसतिगृहाला भेट देणारे पहिलेच मंत्री

वसतिगृहाला भेट देण्यात आतापर्यंत कोणत्याही सामाजिक न्याय मंत्र्यांनी स्वारस्य दाखविले नव्हते. सन २००४ च्या सुमारास या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी उपोषण केले होते. वसतिगृहातील आंदोलनामुळे प्रसारमाध्यमांतून सरकारवर जोरदार टीका होत होती. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातही या वसतिगृहाचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तत्कालिन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांना सुचना करून वसतिगृहाला भेट देण्यास सांगितले होते. त्यानंतर आता धनंजय मुंडे या वसतिगृहाला भेट देत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच्या मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे वसतिगृहाला भेट दिली होती. मुंडे मात्र स्वतःहूनच भेट देत आहेत. विद्यार्थ्यांशी चर्चा करून ते वसतिगृहांमध्ये आणखी उत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने भविष्यात धोरणात्मक निर्णय घेतील असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

आयुक्त प्रवीण परदेशींच्या पीएच्या पत्नीकडूनही ‘वाडिया’ने उकळले महागडे शुल्क

शरद पवारांनी धनंजय मुंडेंना ‘या’ कारणास्तव दिले सामाजिक न्याय खाते

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना बजावले, योजना गोरगरीबांपर्यंत पोहोचवा

आदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार ‘ही’ योजना

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी