31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमुंबईनवनीत राणांचा कोठडीत छळ झालेला नाही : दिलीप वळसे पाटील

नवनीत राणांचा कोठडीत छळ झालेला नाही : दिलीप वळसे पाटील

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. नवनीत राणा यांना हीन वागणूक दिलेली नाही. कोठडीत त्यांचा छळ झालेला नाही. पोलिसांना बदनाम केलं जातंय असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी म्हटलं आहे.दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काही महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत दोन दिवसांत निर्णय होईल असंही म्हटले आहे.महाराष्ट्रात अशांतता पसरविण्यसाठी वारंवार प्रय्तन केले जात आहे. आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. सुरक्षा कोणाला पुरवायची किंवा नाही हे राज्य सरकारची समिती ठरवते. गृह विभागाची ही समिती ठरविते. ही समिती राजकीय निर्णय घेत नाहीत.

महाविकास आघाडी सरकार सत्ते आले, त्यामुळे विरोधक खूष नाहीत. त्यासाठी सरकारला अस्थिर करण्यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत. कोणताही नेता कायदा व सुव्यवस्था वातावरण खराब करणारे विधाने करीत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल असं ही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा :

भोंगे लाऊडस्पीकर लावताना स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी : दिलीप वळसे पाटील

No provision for state govt to either instal or remove loudspeakers: Maharashtra home minister Dilip Walse Patil

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी