32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईमौलवी, पोपकडे त्यांच्या सिद्धांताचे पुरावे मागण्याची 'अनिस'ची हिंमत आहे का? ; 'अनिस'वर...

मौलवी, पोपकडे त्यांच्या सिद्धांताचे पुरावे मागण्याची ‘अनिस’ची हिंमत आहे का? ; ‘अनिस’वर बंदी घालण्याची महिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची मागणी

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ धीरेंद्र महाराज याने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यावर टीका केल्याने वारकरी संप्रदायातून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यावर हीन दर्जाची टिप्पणी करणाऱ्या या भोंदू धीरेंद्र बुवाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अनिस) संस्थापक शाम मानव यांनी त्याची दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. या पळपुट्या भोंदू बागेश्वरचा मुखवटा उतरवून त्याचा खरा सनातनी चेहरा जगासमोर आणण्याचा प्रयत्न अंनिसने केला आहे. पण अनिस केवळ हिंदू धर्मालाच लक्ष्य करीत आल्याचा आरोप पुण्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केला आहे.

हिंदू धर्मविरोधात गरळ ओकणाऱ्या अनिसवर महाराष्ट्रात बंदी आणण्याची मागणी प्रदीप नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अनिसच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. अनिस केवळ हिंदू धर्माला लक्ष्य करण्याचे काम करीत आहे. इतर धर्मांतील वाईट चालीरीतींवर ते टीका का करीत नाहीत. कुठल्यातरी नदीवर नेऊन त्या नदीतील पाणी शिंपडून तुम्ही पवित्र झाल्याच्या भूलथापा ख्रिश्चन धर्मातील पाद्री मारत असतात. अशा पाद्रींविरोधात अनिस आवाज का उठवीत नाहीत? असा सवाल प्रदीप नाईक यांनी विचारला आहे. (Does ‘Anis’ dare to ask the Pope Or Maulavi for proof of his theory?) मशिदीत महिलांना अद्यापही प्रवेश दिला जात नाही. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना देखील मशिदीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. त्याविरोधात अनिस का बोलत नाही? फक्त हिंदू धर्मालाच का ‘टार्गेट’ केले जात आहे?

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल केलेल्या विधानाबद्दल नाईक यांनी आक्षेप नोंदविला आहे. ते म्हणाले, ‘त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.”

(Does 'Anis' dare to ask the Pope Or Maulavi for proof of his theor

 

बागेश्वर बुवांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे   

बागेश्वर महाराज यांनादेखील ‘अनिस’ने लक्ष्य केले असल्याचे या निवेदनात म्हंटले आहे. त्याबाबत नाईक यांना प्रश्न विचारण्यात आला. संत तुकाराम यांच्याबद्दल भोंदू बागेश्वर बुवाने केलेल्या वक्तव्याचा प्रदीप नाईक यांनी निषेध केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “मी देखील वारकरी संप्रदायातीलच आहे. तुकाराम महाराज आपल्या सर्वांसाठी वंदनीय आहेत. बागेश्वर महाराजांनी नेमक्या कोणत्या अर्थाने ही टिप्पणी केली हे जाणून घेतले पाहिजे.” प्रदीप नाईक यांना भोंदू बुवा बागेश्वरने नेमकी कोणती वक्तव्ये केली हे सांगितल्यानंतर त्यांनी बागेश्वर बुवांचा निषेध करीत त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे असे म्हंटले आहे.

भोंदू बागेश्वर काय म्हणतो ते पहा?


हे सुद्धा वाचा

श्याम मानव म्हणाले, धिरेंद्र महाराजांमुळे देशाचे नाव जगात होईल!

पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती

अंधश्रद्धा निर्मूलनकारांचा विज्ञानावरही अविश्वास; राम कदम यांची खोचक टीका

 

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?

संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली म्हणून त्यांना माऊली म्हटलं गेलं. परंतु माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर माझ्या आईने १५ एकर कोरडवाहू शेतीत काम करून चार भिंतीचं घर चालवलं, ती माझ्यासाठी विश्ववंदनीय असायला हवी, असे वादग्रस्त वक्तव्य सुषमा अंधारेंनी यांनी केले होते. पण या वक्तव्याबद्दल त्यांनी वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली होती. कळतनकळतपणे चूक झाली असेल तर वारकरी संप्रदायाची माफी मागते, अशा शब्दांत त्यांनी क्षमा मागितली होती. भोंदू बागेश्वर बुवा प्रामाणिकपणे सर्व महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागणार का? असा सवाल वारकरी संप्रदायातून आता विचारण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी