29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeएज्युकेशनडॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, पुनर्जन्म मिळाला तर, तीच आई, तीच पत्नी, तीच...

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, पुनर्जन्म मिळाला तर, तीच आई, तीच पत्नी, तीच मुले…

पुनर्जन्म मिळाला तर, तीच आई, तीच पत्नी, तीच मुले आणि तेच मित्र मिळावे… खडतर असला तरी हा प्रवास मला पुन्हा करायचा आहे… २०४७ ला शंभरीतला भारत कसा आहे? हे पाहण्यासाठी एक दिवस मला देवाने मला द्यावा… अशी अतिशय भावुक प्रतिक्रिया ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी त्यक्त केली आहे. (Dr. Rghunath Mashelkar became emotional ) कधी शेवटचा दिवस येईल हे सांगता येत नाही पण, कधी शेवटचा श्वास घ्यावा लागला, तर तो पुण्यात असावा अशी इच्छादेखील त्यांनी बोलून दाखविली आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही भावनिक इच्छा व्यक्त केली आहे.

डॉ. माशेलकरांच्या ५८ वर्षांच्या वाटचालीचे साक्षीदार असलेले त्यांचे गुरू डॉ. शर्मा म्हणाले, ‘माझा सहकारी आभाळाइतका मोठा झाल्याचा आनंद आहे. डॉ. माशेलकर यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व दुर्मिळ आहे. तळागाळात होत असलेल्या नवसंशोधनाची भारतात फारसे कौतुक होत नाही. पण भारतातील नवसंशोधनाचे योग्य पद्धतीने कौतुक झाल्यास मोठा बदल घडेल. ते काम डॉ. माशेलकर यांनी केले आहे.

‘दुर्दम्य आशावादी : डॉ. रघुनाथ माशेलकर’ या त्यांच्या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा शनिवारी बागंधर्व रंगमंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. माशेलकर अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी पुणे शहराबद्दलची आत्मीयता बोलून दाखविली. ते म्हणाले, “पुण्यावर माझे फार प्रेम असून या शहराने मला घडवले आहे. मला पुण्याने प्रचंड प्रेम दिले असून, पुण्यातच शेवटचा श्वास घ्यावा.” पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला डॉ. माशेलकर यांचे पीएचडी मार्गदर्शक प्रा. एम. एम. शर्मा, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शा.ब. मुजुमदार, डॉ. माशेलकरांच्या पत्नी वैशाली माशेलकर, पुस्तकाचे लेखक डॉ. सागर देशपांडे आणि सह्याद्री प्रकाशनाच्या संचालिका स्मिता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

मौलवी, पोपकडे त्यांच्या सिद्धांताचे पुरावे मागण्याची ‘अनिस’ची हिंमत आहे का? ; ‘अनिस’वर बंदी घालण्याची महिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची मागणी

पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती

अरेरे!! रुपालीताई, राष्ट्रवादीच्या कार्यालयात चाललंय तरी काय?

 

डॉ. रघुनाथ माशेलकर यांना भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. पंतप्रधानाच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे ते सदस्य राहिले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी