27 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरमुंबईएसी लोकलचे दरवाजे न उघडल्यामुळे प्रवाशांची कोंडी

एसी लोकलचे दरवाजे न उघडल्यामुळे प्रवाशांची कोंडी

पुढील स्थानक नालासोपारा… अशी उद्घोषणा होताच प्रवासी खाली उतरण्यासाठी दरवाजापाशी आले… पण नालासोपारा स्थानक आले तरी लोकलचे (Local Train) दरवाजे काही उघडले नाहीत. लोकल विरारच्या दिशेने पुढे धावल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. नालासोपारा येथे उतरणाऱ्या प्रवाशांना मात्र सक्तीचा प्रवास घडला. अखेर संतप्त झालेल्या काही प्रवाशांनी (Angry passangers) याबाबतचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही लोकल विरार स्थानकात जाऊन थांबली. सोमवारी रात्री साडे आकाराच्या सुमारास मुंबईकडून विरारकडे जाणाऱ्या या लोकलचे दरवाजे न उघडल्यामुळे सर्व प्रवाशांची भंबेरी उडाली. ही लोकल विरार स्थानकावर जाऊन थांबल्यानंतर प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी चक्क मोटारमनालाच (motorman) त्याच्या केबिनमध्ये कोंडून ठेवले. (Doors of AC Local not opened passangers forced to travell to virar)

मुंबईत लोकलने प्रवास करणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच म्हणावे लागेल. कधी तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिराने धावत असतात, तर कधी सिग्नल यंत्रणाच नादुरुस्त होते. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि प्रवासी यांच्यामध्ये नेहमीच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो. आता मात्र वातानुकूलित लोकलच्या निमित्ताने प्रवाशांना रेल्वे प्रशासनाच्या नावे खडे फोडण्यास आणखी एक कारण मिळाले आहे. वातानुकूलित लोकलला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. पण सोमवारच्या या घटनेने रेल्वे प्रशासनाची नाचक्की झाली आहे. ही लोकल विरार स्थानकात येताच संतप्त झालेल्या प्रवाशांनी मोटरमनला केबिनमध्ये कोंडून ठेवले. अखेर या मोटारमनची सुटका करण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. प्रवाशांचा उद्रेक झाल्यामुळे विरार स्थानकात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.

हे सुद्धा वाचा

ढासू आयडिया : पाकिस्तान सीमेवर आता हवेतून गोळ्या झाडणाऱ्या डीआरडीओच्या 25 एलजी ड्रोन या फ्लाइंग मशीन गनची गस्त !

न्यूज चॅनल्सना केंद्र सरकारचा इशारा; हिंसक घटनांचे वार्तांकन करताना खबरदारी घ्यावी लागणार

बीडीडी चाळींच्या परिसरातील पात्र झोपडीधारकांना ३०० स्केअर फुटांचा फ्लॅट मिळणार

छे हो… दरवाजे उघडले प्रवाशांचे कुठे ऐकता..
रेल्वे प्रशासनाने मात्र याचा इन्कार केला असून अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे सांगितले. विरार स्टेशन मास्टरने लोकलचे दरवाजे गार्डने उघडल्याचे म्हंटले आहे. हा प्रकार मोटरमनच्या चुकीमुळे झाला की तांत्रिक बिघाडामुळे याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

बंद दरवाजाच्या घटना घडताहेत वारंवार
अशा प्रकारचा घटना वारंवार घडू लागल्या आहेत. मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे स्थानकात प्रवाशांना याआधीही असाच मनःस्ताप सहन करावा लागला होता. ठाणे स्थानकात वातानुकूलित लोकलचे दरवाजे न उघडल्याने ही लोकल प्रवाशांना घेऊन थेट कळवा कारशेडमध्ये गेली होती. अखेर प्रवाशांनी आरडाओरड सुरु केल्यानंतर लोकलच्या गार्डला जाग आली आणि त्याने दरवाजे उघडले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी