27 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरटेक्नॉलॉजीढासू आयडिया : पाकिस्तान सीमेवर आता हवेतून गोळ्या झाडणाऱ्या डीआरडीओच्या 25 एलजी...

ढासू आयडिया : पाकिस्तान सीमेवर आता हवेतून गोळ्या झाडणाऱ्या डीआरडीओच्या 25 एलजी ड्रोन या फ्लाइंग मशीन गनची गस्त !

पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने (DRDO) ढासू आयडिया लढविली आहे. या संस्थेने 25 एलजी ड्रोन मॉडेल तयार केले आहे. हे हवेतून गोळ्या झाडणारे खतरनाक स्वयंचलित ड्रोन आहे. डीआरडीओची ही फ्लाइंग मशीन गन पाकिस्तान सीमेवर गस्त घालण्यासाठी वापरली जाणार आहे. 25 एलजी ड्रोन मध्ये मशीनगन लोड केली जाऊ शकते. ड्रोनवरील या मशीनगनमधून गोळीबाराच्या सुमारे 150 फेऱ्या झाडल्या जाऊ शकतात. सिंगल शॉट आणि ऑटोमॅटिक अशा दोन मोडमध्ये ड्रोनवरील मशीनगन फायर करू शकते.

पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने (DRDO) ढासू आयडिया लढविली आहे. या संस्थेने 25 एलजी ड्रोन मॉडेल तयार केले आहे. (Deadly 25lg Drones) हे हवेतून गोळ्या झाडणारे खतरनाक स्वयंचलित ड्रोन आहे. डीआरडीओची ही फ्लाइंग मशीन गन पाकिस्तान सीमेवर गस्त घालण्यासाठी वापरली जाणार आहे.

पाकिस्तान सीमेवर अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी अलीकडे पाकिस्तानी बाजूकडून मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर केला जात आहे. भारताची ही पश्चिम सीमा ओलांडून शस्त्र तस्करीही होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी डीआरडीओने विकसित केलेली फ्लाइंग मशीन गन म्हणजेच 25 एलजी हा मानवरहित ड्रोन अर्थात यूएव्ही (UAV) उपयुक्त ठरणार आहे.

भारतीय संरक्षण संशोधन शाखा म्हणजेच आयडीआरडब्ल्यूने (IDRW) ही माहिती जाहीर केली आहे. या सशस्त्र ड्रोनचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे डीआरडीओचे महासंचालक (तंत्रज्ञान व्यवस्थापन) हरी बाबू श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. त्यात आणखी काही तांत्रिक सुधारणा केल्या जात आहेत. 25 एलजी ड्रोन मध्ये मशीनगन लोड केली जाऊ शकते. ड्रोनवरील या मशीनगनमधून गोळीबाराच्या सुमारे 150 फेऱ्या झाडल्या जाऊ शकतात. सिंगल शॉट आणि ऑटोमॅटिक अशा दोन मोडमध्ये ड्रोनवरील मशीनगन फायर करू शकते.

प्रात्यक्षिकांदरम्यान, ड्रोनने गोळ्यांचे राऊंड फायर केल्यानंतर थोडा मागे झटका बसण्याचा प्रभाव दाखवला आहे. मात्र, लेझरच्या सहाय्याने अचूकपणे टार्गेट शूट केली गेली. सीमेवर चीन आणि पाकिस्तानी ड्रोन सातत्याने आढळत आहेत. दुश्मन ड्रोनचा खात्मा करणारी ही अॅंटीड्रोन सिस्टीम आहे. 150 मीटर ते 10 किलोमीटर अंतरावरील अनोळखी ड्रोन 25 एलजीमधून मशीनगन फायरने उडविले जाऊ शकते. सध्याच्या रशियावरुद्ध युद्धात युक्रेनकडून अशाच तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आता प्राथमिक टप्प्यात असलेल्या 25 एलजी ड्रोनमध्ये अधिक सेन्सर जोडले जातील, असे डीआरडीओच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे ते लक्ष्य अधिक चांगल्या पद्धतीने ओळखण्याची क्षमता सुधारेल आणि लांब अंतरावरील लक्ष्यही अचूकपणे टिपता येऊ शकेल.

हे सुद्धा वाचा : 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी डीआरडीओची उडवली खिल्ली

Viral News : धक्कादायक! ऑनलाईन साईटवरून मागवला ड्रोन, हाती पडले बटाटे

पाकिस्तानसमोर दहशतवादाचे आव्हान; सीमाभागातील हजारो लोक रस्त्यावर

Deadly 25lg Drones , डीआरडीओ 25 एलजी ड्रोन, DRDOs Flying Machine Guns, Pakistan Border Security, ढासू आयडिया

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी