34 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमुंबईप्रदूषणमुक्त वातावरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या मौलिक सूचना, काय म्हणाले मुख्यमंत्री

प्रदूषणमुक्त वातावरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या मौलिक सूचना, काय म्हणाले मुख्यमंत्री

राज्यातील वायू प्रदूषणाबाबत करावयाच्या उपाययोजना याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी वर्षा या  शासकीय निवासस्थानी महत्वाची बैठक पार पाडली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी, एमएमआरडीएच्या बांधकाम साईटस् धुळमुक्त करा. अर्बन फॉरेस्ट संकल्पनेवर भर द्यावा. मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी विशेष पथके तयार करावीत. प्रदूषणविरोधी मोहीम लोक चळवळ झाली पाहिजे. बांधकाम साईटवर स्मॉगगन स्प्रिंकलर बसवावेत. मुंबईतील प्रमुख रस्ते पाण्याने धूवून स्वच्छ करावेत. आदी सूचना करून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याकरिता प्रशासनाला आदेश दिले.

मुंबईसह राज्यातील हवेची गुणवत्ता कमी कमी झाली आहे. याचा परिणाम जीवनमानावर झाला आहे. दिपावलीनिमित्ताने हवेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी हायकोर्टाने 5 नोव्हेंबर रोजी आक्रमक भूमिका घेतली. विकासकामांपेक्षा लोकांचा जीव महत्वाचा आहे. काही दिवस बांधकामे बंद राहिलं तर आभाळ कोसळणार आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

मुंबई महापालिकेला बांधकाम बंदीबाबत हायकोर्टाकडून अखेरची संधी देण्यात आली असल्याने कोर्टाने स्पष्ट केलं आहे. येत्या शुक्रवारपर्यंत हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा न झाल्यास दिवाळीचे चार दिवस बंदी लागू करणार असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. बांधकामातील डेब्रिज वाहून नेणारी वाहनं ताडपत्रीनं पूर्णपणे झाकणं बंधनकारक असून फटाक्यांवर बंधी घालण्याची इच्छा नाही, असं असताना कोर्टानं घालून दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन करा, असं देखील हायकोर्टाने सांगितलं.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, पऱ्यावर विभागाचे सचिव आणि विविध महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित होते.

मुंबई उच्च न्यायालय, पर्यावरण विभाग आदींच्या सुचनांचे पालन करा अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी करत, मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये प्रदूषण वाढत चालले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रात आणण्यासाठी, दररोज शहरातील रस्ते बोरिंगच्या पाण्याने धुवा, हे पानी कमी पडत असेल तर भाड्याने टँकर घेऊन रस्ते स्वच्छ करा, अशाही सूचना देण्यात आल्या. शहरी भागात शहरी जंगल (अर्बन फॉरेस्ट) तयार केल्यास प्रदूषण कमी होऊ शकते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हे सुद्धा वाचा 

२४ डिसेंबरनंतर महाराष्ट्रात काय घडणार?
रश्मिका मंदानानंतर सारा-शुभमनही ‘डीपफेक’चे बळी

Lalit Patil Drugs Case | ललित पाटीलच्या संपत्तीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रदूषणमुक्तीसाठी सूचना

0 एमएमआरडीएच्या बांधकाम साईटस् धुळ मुक्त करा.

0 अर्बन फॉरेस्ट संकल्पनेवर भर द्यावा.

0 मुंबईतील रस्ते धुळमुक्त करण्यासाठी विशेष पथके तयार करावीत.

0 प्रदूषणविरोधी मोहीम लोक चळवळ झाली पाहिजे

0 बांधकाम साईटवर स्मॉगगन स्प्रिंकलर बसवावेत.
0 मुंबईतील प्रमुख रस्ते पाण्याने धूवून स्वच्छ करावेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी