31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमुंबईएकनाथ शिंदे यांना वेळच मिळत नसल्याने मुंबईतील तीन पूलांचे उदघाटन रखडले

एकनाथ शिंदे यांना वेळच मिळत नसल्याने मुंबईतील तीन पूलांचे उदघाटन रखडले

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबईत वेगाने कामे होत असुन मागील काही दिवसांपासून एमएमआरडीएचे तीन ब्रिज तयार आहेत. मात्र हे पूल वाहतुकीसाठी मात्र अद्याप बंद आहेत. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पूलांचे उद्घाटन करण्याचा एमएमआरडीएचा मनोदय आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांची उद्घाटनासाठी तारीख ठरत नसल्याने पूलांचे उद्घाटन लांबले आहे.

त्यामुळे नवीन पूल असुन देखील मुंबईकरांना वाहतुकोंडीचा सामना मात्र दररोज करावा लागत आहे. मुंबईत 3 ठिकाणी नवीन उड्डाण पुल तयार आहेत. पण मुख्यमंत्री यांस वेळ मिळत नसल्याने मागील मागील 20 दिवसापासून सुरु केले जात नाही. यात घाटकोपर द्रुतमार्गावरील छेडा नगर, कुर्ला येथील सांताक्रूझ- चेंबूर जोडमार्गावरील सीएसटी आणि हंस भृगा मार्ग जोडणारे दोन्ही भाग याचा समावेश आहे. आधीच प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत. आणि उशीराने ज्या प्रकल्पाचे काम पूर्ण होते तेथे उद्घाटन करण्याच्या नादात अजून वेळ लागत आहे. मुख्यमंत्री यांस वेळ मिळत नसेल तर अन्य प्रकल्पासारखे यात प्रकल्पातील पूर्ण झालेले काम वाहतूकीसाठी सुरु करण्यात यावा, अशी विनंती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांची आहे.

हे सुद्धा वाचा 
फडतूस- काडतूस वादात नेटकऱ्यांनी काढली बावनकुळेंची औकात ! 

आणखी कितींचे तोंड दाबणार; 50 खोकेनंतर ‘भोंगळी’ गाणाऱ्या रॅपरला अटक होताच नागरिक संतप्त 

अनिल गोटे यांच्या नावाने शरद पवारांवर टीका करणारे व्हायरल झालेले पत्र खोटारडे!  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी हे जनतेचे सरकार असल्याचे सांगत असतात मात्र मुंबईतील जनता दररोज वाहतुक कोंडीमुळे त्रस्त होत असताना देखील पुलांचे उद्घाटन केवळ त्यांना वेळ मिळत नसल्याने रखडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने वेळात वेळ काढून पूलांचे उद्घाटन करावे, जेणे करुन मुंबईकरांचा वाहतुककोंडीचा त्रास कमी व्हावा असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी