27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeमुंबईशरद पवारांच्या तोंडाला आजार झालाय, इतर विषयांवर बोलता लव्ह जिहादवर का नाही...

शरद पवारांच्या तोंडाला आजार झालाय, इतर विषयांवर बोलता लव्ह जिहादवर का नाही बोलत? सदावर्तेंची पातळी घसरली

कथित ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आणि धर्मांतर विरोधी कायद्याच्या समर्थनार्थ देशभरातून दबाव निर्माण होत असतानाच रविवारी मुबंईत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपले राजकीय उपद्रवमूल्य वाढविणारे सामाजिक कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली आहे. (Gunratna Sadavarte commented on Sharad Pawar mouth Disease) पवारांच्या वैयक्तिक व्यंगावर बोट ठेवत सदावर्ते यांनी ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर त्यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, शरद पवार यांच्या तोंडाला आजार झाला आहे. त्यांना इतर विषयावर बोलायला सुचते मग लव्ह जिहादच्या मुद्द्यावर पवार का गप्प बसतात.”

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना मर्यादा सोडली असून त्यांच्या व्यक्तिगत व्यंगावर उपरोधिक भाष्य केले आहे. रविवारी मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. गुणरत्न सदावर्ते हेदेखील या मोर्चात सहभागी झाले होते. कथित ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना सदावर्ते यांची जीभ घसरली.

हे सुद्धा वाचा

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दिली मुस्लिमांना उमेदवारी !

मौलवी, पोपकडे त्यांच्या सिद्धांताचे पुरावे मागण्याची ‘अनिस’ची हिंमत आहे का? ; ‘अनिस’वर बंदी घालण्याची महिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची मागणी

पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती

 

शरद पवार यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, “सर्व बाबी लक्षात घेता आज येथे हिंदू समाज एकवटला आहे. शरद पवार यांच्या तोंडाला आजार झालेला आहे. त्यांना दुसऱ्या विषयावर बोलायला सुचते. तर मग ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावर पवार का बोलत नाहीत. हैदराबादचा मियाँभाई ‘लव्ह जिहाद’वर का बोलत नाही.” दरम्यान, मुंबईत आयोजित केलेल्या या हिंदू जनआक्रोश मोर्चात भाजपचे नारायण राणे, किरीट सोमय्या यांसारखे अनेक दिग्गज नेते सहभागी झाले. या मोर्चादरम्यान लव्ह जिहादविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 

लव्ह जिहाद हे पाकिस्तानचे षडयंत्र
सदावर्ते यांनी ‘लव्ह जिहाद’ हे पाकिस्तानचे षडयंत्र असल्याची टीका केले आहे. ते म्हणाले,’पाकीस्तानी लोकांच्या नीच विचारांतून ‘लव्ह जिहाद’ची सुरुवात झाली आहे. याला गडण्यासाठीच आज मुंबईत हिंदू समाज एकवटला आहे. याविरोधात कायदा आणावा अशी आमची मागणी आहे. दाऊद इब्राहीमचा, बाबरचा विचार दफन करा. संत म्हणून आले आणि धर्मप्रचार करायला लागले आहेत.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी