26 C
Mumbai
Tuesday, February 20, 2024
Homeराजकीयविधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दिली मुस्लिमांना उमेदवारी !

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दिली मुस्लिमांना उमेदवारी !

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून येत्या १६ फेब्रुवारीला यासाठी मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने आपलया पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने आपले ४८ तर काँग्रेसने १७ उमेदवार घोषित केले आहेत. भाजपने आपल्या दिग्गज नेत्यांना पुन्हा रिंगणात उतरवले असून मुख्यमंत्री पदाच्या दावेदार समजल्या जाणाऱ्या केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक आणि मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा, (Dr. Manik Sahaa) प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महत्वाची बाब म्हणजे भाजपने दोन मुस्लिम उमदेवारांनाही तिकीट दिले आहे. (BJP gave ticket to Muslim candidates for assembly elections) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडचिट्ठी देऊन शनिवारीच भाजपच्या गोटात दाखल झालेल्या या दोन्ही उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री विप्लव देव यांचा पत्ता मात्र भाजपने यावेळी कापला आहे. तर काँग्रेसने सुदीप रे बर्मन यांना उमेदवारी दिली आहे.

मुस्लिमद्वेष्ट्या अशी ओळख पुसण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत असून या विधानसभेसाठी भाजपने दोन मुस्लिमांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. मोहमद मोबेशर अली आणि तफजल हुसेन या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून भाजपमध्ये आलेल्या दोन मुस्लिम उमेदवारांना (Muslim candidates) तिकीट देण्यात आले आहे. मोबेशर अली कैलाशहरमधून तर तफजल हुसैन बॉक्सनगरमधून निवडणूक लढवीत आहेत. याव्यतिरिक्त भाजपच्या यादीत ११ महिला उमेदवारांनाही तिकीट देण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेल्या प्रतिमा भौमिक यांना धनपूर येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य हे बनवलीपुरममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मागील वर्षी याच मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली होती.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची शनिवारी पक्षाच्या मुख्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र नोंदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

मौलवी, पोपकडे त्यांच्या सिद्धांताचे पुरावे मागण्याची ‘अनिस’ची हिंमत आहे का? ; ‘अनिस’वर बंदी घालण्याची महिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची मागणी

पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती

MSRTC: २२७ बस स्थानकांच्या पुर्नविकासाठी ९८५ कोटी खर्च; महामंडळाची राज्य सरकारकडे मागणी

 

काँग्रेसचे तीन मुख्यमंत्री प्रचारासाठी रिंगणात
त्रिपुरा विधानसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून भाजप आणि काँग्रेसने आपलया दिग्गज नेत्यांना प्रचारमोहिमेत उतरविले आहे. भाजपच्या प्रचाराची धुरा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या खांद्यावर आहे. तर काँग्रेसचा प्रचार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी, राज्य प्रभारी अजय कुमार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहेलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आदी दिग्गज नेते कारणात आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचार रंगतदार होणार आहे.

निवडणुकांवर हिंसाचाराचे मळभ
त्रिपुरामध्ये मागील पाच वर्षे डाव्या पक्षाची एकहाती सत्ता आहे. डाव्यांकडून सत्तेची सूत्रे हिसकावून घेण्यासाठी भाजपने शड्डू ठोकला आहे. या निवडणुकीत हिंसाचाराचे मोठे आव्हान सुरक्षा यंत्रणांपुढे आहे. राज्यातील तीन हजार ३२८ मतदार केंद्रांपैकी तब्बल एक हजार १०० केंद्र असुरक्षित म्हणून घोषित करण्यात आली आहेत. याशिवाय २८ केंद्र अतिसंवेदनशील आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी