27 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरमुंबईशेतीमध्ये कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव !

शेतीमध्ये कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव !

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघातर्फे कृषी फलोत्पादन, ऑरगॅनिक, रीटेल, फुड, प्रक्रिया, सिंचन परिषदे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई फोर्ट येथील केआर कामा हॉल येथे दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता ही परिषद पार पडणार आहे. याप्रसंगी भारतीय कृषी अनुसंधान परिषद (Indian Council of Agricultural Research) भारत सरकार मुख्य मार्गदर्शक संचालक डॉ.सुजितकुमार शुक्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Honor to the farmers who perform in agriculture!)

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हापूस, केशर या वाणांची लागवड करण्यात येते. राज्यातून आंब्याची निर्यात वाढविण्यासाठी दर्जेदार उत्पादनाबरोबरच त्यासाठी लागणाऱ्या गुणवत्ता प्रमाणकाकडेही तेवढेच लक्ष शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे. भारताच्या कृषि क्षेत्राच्या जागतिक व्यापारामधील समावेशामुळे फळांच्या निर्यातीसाठी चांगल्या संधी निर्माण झालेल्या आहेत. विशेषत: आंब्याची मोठयाप्रमाणात झालेली लागवड आणि उत्पादन पाहता या फळांच्या निर्यातीस चांगला वाव राहणार आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या अध्यक्षतेखाली या कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात कृषी, फलोत्पादन, ऑरगॅनिक, रिटेल, फूड, प्रक्रिया, सिंचन आदि क्षेत्रात विशेष उल्लेखनिय कार्य केलेल्या उद्योगांना व शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी  त्याचप्रमाणे कृषी फलोत्पादनासाठी प्रभावी ठरत असलेल्या ऑरगॅनिक उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनाची माहिती देखील देण्यात येईल.

 हे सुद्धा वाचा :  Employment fairs : रोजगार मेळाव्यांसाठी राज्य सरकारने केली कोट्यवधींची तरतूद; मेळावा घेण्यासाठी मिळणार इतका निधी!

‘कृषि’तुल्य शरद पवार! (निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा विशेष लेख)

VIDEO : शेतकरी हैराण सरकार खातो गायरान

यावेळी आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, रसायन तंत्रज्ञान संस्था अभिमत विद्यापिठाचे कुलगुरु अनिरुद्ध पंडित,  एनसीडीईएक्स इ मार्केटस्, लि.चे व्यवस्थापकिय संचालक मृगांक परांजपे, जीपी पारसिक सहकारी बँक मर्यादितचे चेअरमन नारायण गावंड, कृषी विभाग ठाणे महाराष्ट्र शासनाचे सहसंचालक अंकुश माने यांचे खास मार्गदर्शन लाभणार आहे.

या कृषी मेळाव्याच्या अधिक महितीसाठी इमेल [email protected] आणि दुरध्वनी क्र. ९९२०१८४६६६ / ९५९४८८४६६६ वर संपर्क करावे आणि कृषी फलोत्पादन क्षेत्रातील या महनिय समारंभास उपस्थित राहावे, अशी विनंती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी