28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रजालना औद्योगिक वसाहत केंद्रात जीएसटी पथकाची धाड

जालना औद्योगिक वसाहत केंद्रात जीएसटी पथकाची धाड

जालना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत एका वर्षांपूर्वी जीएसटी विभागाच्या पथकाने धाडी टाकल्या. २ ते ३ स्टील कंपन्यांवर जीएसटीच्या पथकाने या धाडी टाकत तपासही केला. सततच्या धाडी पडत असल्यामुळे जालन्यात व्यापाऱ्यांची झोप उडाली होती. तिच परिस्थिती पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. जालना औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्यांना गुरुवारी अचानक जीएसटीच्या एका टीमने भेट देत हिशोब तपासणी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

या तपासात कंपन्यात येणाऱ्या ट्रक आणि त्यातील भंगाराचे सामान तसेच तयार होणाऱ्या लोखंडी सळया यांच्या हिशोबाची तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळते. २०२२ मध्ये म्हणजेच मागील वर्षात जालना एमआयडीसीच्या काही नामवंत कंपन्यांवर जीएसटी डीजीआयच्या पथकाने तब्बल चार ते पाच दिवस ठाण मांडून हिशोब न जुळलेल्या कोट्यावधी रुपयांच्या अवैध किंवा बेहिशोबी पैसे ताब्यात घेतले. ही घटना ताजी असतानाच गुरूवारी अचानकपणे दहा ते बारा जणांचे पथक जालना एमआयडीसी मध्ये काही नामवंत कंपन्यांचा हिशोब तपासताना दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे ही वाचा

राधाकृष्ण विखे पाटलांनी वाळू नियमनासाठी घेतली बैठक, तिथे वाळू चोरांच्या नेत्याला सन्मानाचे स्थान !

अतुल सावेंच्या प्रयत्नांना यश; जामखेडमधील धनगर आरक्षणासाठीचे उपोषण मागे

मार्शच्या ‘त्या’ कृत्यावर शमी भडकला

या प्रकरणी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता व्यापाऱ्यांनी माझ्याकडे नाही तर त्यांच्याकडे आले आणि त्यांना विचारले असता माझ्याकडे देखील नाही त्यांच्याकडे आले असतील असे परस्पर उत्तरं काही उद्योजकांनी दिली आहेत. थोडक्यात काही उद्योजकांनी खरे सांगण्यापासून टोलवा टोलवीची उत्तरं दिली असल्याचे समजते.

मागील वर्षी जालन्यात झालेल्या जीएसटीच्या धाडीने एकच खळबळ उडाली होती. मात्र मागील वर्षी काही कंपन्यांमध्ये धाड घातली असून त्याहून अधिक धाड ही कापड विक्र दुकानात घातली होती. काही तास कपड्यांच्या दुकानात तपासणी सुरूच होती. शटर बंद करून तपासणी सुरू होती, यामुळे नेमकी कोणती तपासणी चालु आहे, हे दुकानदारांना कळत नव्हते. अचानक पडलेल्या धाडीला कसे सामोरे जायचे हे कळत नसल्याने दुकानदारांच्या मनात भितीचे वातावरण पसरले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी