33 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरमुंबईकिशोरी पेडणेकर यांना एसआरए घोटाळा प्रकरणात दिलासा; उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले 'हे'...

किशोरी पेडणेकर यांना एसआरए घोटाळा प्रकरणात दिलासा; उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले ‘हे’ आदेश

कथित एसआरए घोटाळा प्रकरणात (SRA scam case) मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर  (Kishori Pednekar) यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी पुढील निर्देश देईपर्यंत मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल करु नयेत असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयातील सुनावणी ३० मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे पेडणेकर यांच्यासाठी आता काही काळ दिलासा मिळाला आहे. Kishori Pednekar gets temporary relief from High Court in SRA scam case

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात एसआरए गोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा त्यांनी एसआरए मध्ये काही घरे लाटल्याचे बाबतचा आहे. वरळी येथील गोमाता नगर येथे एसआरए योजना राबविण्यात आली आहे. गोमाता नगर येथे  किशोरी पेडणेकर यांचा काही संबंध नव्हता. मात्र  त्यानंतर ही त्यांच्या कंपनीच्या नावावर काही गाळे आहेत. बनावट कागदपत्रांचा वापर करून पेडणेकर यांनी ही घर लाटल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी पाठपुरावा केल्यावर पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

हे सुद्धा वाचा

नवाब मलिक खरच आजारी आहेत का; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

PHOTO: मुंबईच्या रस्त्यांवर धावली देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस

खासदार श्रीकांत शिंदे यांनी गुंड राजा ठाकूरला दिली जीवे मारण्याची सुपारी : संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

किशोरी पेडणेकर यांनी हा गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर मंगळवारी (दि.२१) रोजी सुनावणी झाली. कथित एसआरए घोटाळा प्रकरणी तूर्तास आरोपपत्र दाखल न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने मुंबई पोलिसांना दिलेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे. आरोपपत्र दाखल न झाल्यास हा खटला चालणार नाही. आधी गुन्हा रद्द करण्याचा याचिकेवर सुनावणी होईल. हा पेडणेकर यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी