33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeमुंबईPHOTO: मुंबईच्या रस्त्यांवर धावली देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस

PHOTO: मुंबईच्या रस्त्यांवर धावली देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस

मुंबईची शान असलेल्या बेस्टच्या डबल डेकर बसेसचा इतिहास आता डिजिटलप्रणालीत प्रवेश करत आहे. बेस्टच्या डबलडेकर बसेस अत्यंत जुन्या झाल्याने त्यांची देखभाल करणे अवघड झाले आहे. त्यामुळे बेस्टच्या डिजिटलीकरणात आता नव्या इलेक्ट्रीक एसी डबल डेकर बसेस दाखल झाल्या आहेत. (Electric Double Decker AC bus)

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST)च्या भारतातील पहिल्या एसी डबल-डेकर इलेक्ट्रिक बसेसचा ताफा या आठवड्यात मुंबईच्या रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाला आहे. आजपासून (21 फेब्रुवारी) सीएसएमटीहून सकाळी पावणे नऊला पहिली बस सुरु झाली. नरिमन पॉईंटच्या एनसीपीएपर्यंतच्या रुटवर ही बस चालणार आहे.

BEST gets the first batch of electric double decker bus from SWITCH Mobility - Electrikez

मुख्यतः प्रवाशांना शनिवार, रविवार डबलडेकर बसमधून हेरिटेज टूर करता येणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्ह, चर्चगेट, फोर्ट, कुलाबा या परिसरात पर्यटकांना एक छान फेरफटका मारता येईल.

The 200 buses which will be introduced by BEST this year, will reduce BEST’s carbon footprint and will also save around 26 million litres of diesel per year. The BEST recently conducted a travel study across the city. The ridership of BEST has grown from 22.5 lakhs to 35 lakhs and by adding more buses across the city, they plan to cross over 40 lakhs ridership soon

देशातील पहिली स्विच मोबिलिटी निर्मित या प्रत्येक डबल-डेकर ई-बसची किंमत ₹2 कोटी असून एका बसमध्ये प्रत्येकी सुमारे 90 प्रवासी प्रवास करू शकतात.

First electric AC double decker bus started today from CST to NCPA today Pic/Pradeep Dhivar

ही बेस्ट सेवा वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक या मार्गांवर धावणार आहे. कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गावर सुरुवातीला ही बस धावेल. या एसी बसचं कमीत कमी भाडं ५ किलोमीटरपर्यंत ६ रुपये असणार आहे.

Double Decker AC Bus _ 1

या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चालक-वाहक यांच्यातील संपर्कासाठी विशेष व्यवस्था, बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे असतील.

PHOTO: मुंबईच्या रस्त्यांवर धावली देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस

विशेषतः शहरातील या आगामी 200 इलेक्ट्रिक बसेसच्या वापरामुळे पर्यावरणतील कार्बनडायऑक्साईडचे जवळजवळ 41% प्रमाण कमी होणार असून दरवर्षी 26 दशलक्ष लिटर डिझेलची बचत देखील होणार आहे.

Ac Double Decker bUs _ 6

ही स्विच EiV22 मॉडेल असून यात 231-kWh एवढ्या क्षमतेची त्याची बॅटरी आहे. ही बस एका संमिश्र ॲल्युमिनियम धातुपासून तयार करण्यात आली असून ती अधिक स्थिर आहे. त्याचप्रमाणे यात 300-400 किलोग्रॅम वजनाच्या बॅटरीसाठी टायर जवळ एक विशेष जागा देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : BEST झालं राव: नव्या मेट्रोमुळे बेस्टला आले ‘अच्छे दिन’

BEST: मुंबईच्या रस्त्यांवर धावणार देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल-डेकर एसी बस

रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिका लागू करा; माजी आरोग्य मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी