32 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमुंबईनवाब मलिक खरच आजारी आहेत का; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

नवाब मलिक खरच आजारी आहेत का; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जामीन मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) अर्ज केला आहे. या अर्जावर वेळे अभावी मंगळवारी (दि.२१) सुनावणी झाली नाही. मात्र, आरोपी नवाब मलिक खरंच आजारी आहेत हे पटवून द्या, असे आदेश आज उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांच्या वकिलांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि अंमलबजावणी संचलनालय (ईडी) च्या गुन्ह्यातील आरोपी असून सध्या ते तुरुंगात आहेत. (Nawab Malik Is Really Sick; Bombay High Court question)

तुरुंगात असताना असताना ते आजारी पडलेत. त्यांना किडनीचा आजार झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते हॉस्पिटलमध्ये राहून उपचार घेत आहेत. आजारपणाच्या कारणामुळे आपल्याला जामीन द्यावा, असा त्यांचा अर्ज आहे. त्यावर सध्या उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. नवाब मलिक हे आजारी नाहीत, त्याच्या आजारपणाच्या चौकशीसाठी सरकारी डॉक्टरांची टीम बनवावी अशी मागणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली होती. मागच्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालय नवाब मलिक खरच आजारी आहेत का असा प्रश्न विचारला होता. मलिकांना कोणताही गंभीर आजार नसल्याचा, तपासयंत्रणेनं हायकोर्टात दावा केला आहे. नवाब मलिकांची जामीनासाठीची याचिका फेटाळून लावण्याची ईडीने मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा 
PHOTO: मुंबईच्या रस्त्यांवर धावली देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस
किशोरी पेडणेकर यांना एसआरए घोटाळा प्रकरणात दिलासा; उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले ‘हे’ आदेश
गुजरातच्या पाणीपुरीवाल्या मोदीची सोशल मिडियावर धूम! व्हिडिओ होतोय व्हायरल

दरम्यान या नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आता २५ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. मलिक यांच्या जामीनासाठी तपास यंत्रणांनी विरोध केला असून ते खरेच आजारी आहेत काय? अशी विचारणा याआधी न्यायालयाने केली होती. त्यामुळे पुढच्या सुनावणीत आता त्यांच्या आजारपणाबाबत युक्तीवाद होऊ शकतो. त्यावेळी न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी