28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
HomeमुंबईKonkan MHADA Lottery : 5311 कोकणवासियांना मिळालं हक्काचं घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची...

Konkan MHADA Lottery : 5311 कोकणवासियांना मिळालं हक्काचं घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

कोकणवासियांसाठी म्हाडाचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “या सरकारचे ध्येय आहे, की देशातील प्रत्येकाला हक्काचे स्वत:चे घर मिळावे, विविध योजनांच्या माध्यमांतून घरे देण्याचा शासनाचा संकल्प आहे. आज 5311 लोकांना घरे दिली. आता पारदर्शक सोडत काढली. यात कुणालाही तक्रार करण्याची संधी ठेवली नाही. ज्यांची निवड झाली त्यांना ऑनलाईन मेसेज पाठविले जात आहेत. ई-फॉर्म पद्धत सुरू झाली. आज पाच प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. यामुळे कोणालाही त्रास होणार नाही”, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. 

यावेळी  गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार संजय येळकर, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, नारायण पवार, जितेंद्र कोळी, जिल्हाधिकारी शिंगारे आदी उपस्थित होते. म्हाडाचे व्हीपी संजीव जैस्वाल उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “यापुढे तुम्हाला पैसे भरण्याचाही त्रास होणार नाही. याद्वारे लाभार्थींना कुठलाही त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. शासनाने पारदर्शकता आणून मुंबई, पुणे मंडळाची सोडत काढली आहे. संगणकीय पद्धतीने सोडत काढली आहे.”

“पंतप्रधान मोदींनी संकल्प केला आहे की, प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहीजे. नुकतेच सोलापूर मध्ये 15 हजार घरे दिली आहे. उर्वरित 15 हजार घरे लवकर देण्यात येणार आहेत. गिरणी कामगाराची आयुक्तांच्या माध्यमातून नोंदणी करून घेतली आहे. दीड लाख जणांची नोंद झाली आहे. लवकरच त्यांना घरांचे वितरण करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षभरता 1 लाख घरे देण्याचा आमचा संकल्प आहे. पाच ट्रिलियन इकॉनॉमी करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला हक्काचे घरे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्यांना घरे मिळाली नाहीत, त्यांना लवकरच घरे देण्याचा प्रयत्न केला जाईल”, असेही आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे.

कोकण विभागामध्ये 5311 घरांसाठी 15 सप्टेंबरपासून अर्जाची खरेदी विक्री आणि अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 17 नोव्हेंबरपर्यंत या प्रक्रियेमध्ये 31433 जणांनी अर्ज सादर केले होते. अनामत रक्कमेसह अर्ज सादर करणारे 24303 जण पात्र ठरले होते. ही सोडत 7 नोव्हेंबरला होणार होती. पण कोकण मंडळाने अर्जविक्री- स्वीकृतीला मुदतवाढ दिल्याने 7 नोव्हेंबरची सोडत पुढे ढकलून 13 डिसेंबरला सोडत काढण्याचे मंडळाने त्यावेळी जाहीर केले होते. मात्र ती तारीख देखील बदलण्यात आली होती.

घरांसाठी सोडत जाहीर झाली आहे, घर ज्यांना जाहीर झाले आहे त्यांना SMS द्वारा निकाल कळवला जात आहे. म्हाडाच्या वेबसाईटवर निकालाच्या संध्याकाळी प्रतिक्षायादी देखील जाहीर होणार आहे. घराची पसंती झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाते. ज्यांना हा निकाल पाहायचा आहे, त्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

हेही वाचा : Maratha Reservation : “अट्टहास सोडा, जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नका”, फडणवीसांचं जरांगेंना आवाहन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी