33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
HomeमुंबईMumbai Police : ‘आले रे आले मुंबई पोलीस’, हे गाणं सोशल मीडियावर...

Mumbai Police : ‘आले रे आले मुंबई पोलीस’, हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल; गाणं पाहून तुम्हीही कराल सलाम!

नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर 24 तास पेलतात ते पोलीस, स्वतःची सुखं-दुःखं बाजूला ठेवून नागरिकांची अहोरात्र काळजी करतात ते पोलीस, समाजातील गुन्हेगारीवर वेळीच आळा घालतात ते पोलीस आणि प्रत्येक नागरिकांची संरक्षण करणं हेच आमचं कर्तव्य म्हणत खाकी वर्दीची बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर दहशत बसवतात ते पोलीस… आज त्या मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केलाय, त्यातून एक गाणं लोकांसमोर त्यांनी आणलंय आणि पोलिसांच्या उत्तम कामगिरीची झलक दाखविण्यात आली आहे.

सोशल मीडियावर ‘आले रे आले मुंबई पोलीस’ अशा कॅप्शनमध्ये हे गाणं अपलोड करण्यात आलंय. व्हिडीओमध्ये खाकी वर्दीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दाखवलंय. यामध्ये महिला पोलीस अधिकारी यांचासुद्धा समावेश आहे. मुंबई पोलीस नागरिकांना कशाप्रकारे मदत करतात, त्यांची काळजी कशी घेतात आणि समाजातल्या गुन्हेगारीवर कसा वचक ठेवतात, हे सगळं त्यांनी या व्हिडीओतून मांडलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही मुंबई पोलिसांनी सॅल्यूट मारला आणि त्यांचा योग्य सन्मान कराल.

विनाहेल्मेट प्रवास करणारा तरुण ट्रॅफिक पोलिसांना फसवून पुढे जातो आणि त्याचा नंतर अपघात होतो. पण, नंतर हेच ट्रॅफिक पोलिस त्या तरुणाच्या मदतीला जातात. नंतर रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणींना निर्भया पथक वेळेत येऊन मदत करतात, हरवलेल्या लहान मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत सुखरूप पोहचवतात, सोन्याची वस्तू चोरून नेणाऱ्या चोरट्यांना पकडून ती वस्तू ज्या महिलेची आहे तिला परत करतात… हे सगळं  ‘आले रे आले मुंबई पोलीस’ या गाण्यातून दाखविण्यात आलंय. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

 ‘आले रे आले मुंबई पोलीस’ हे गाणं मयूर राणे यांनी तयार केलंय, तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ मुंबई पोलीस यांच्या @mumbaipolice या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलंय. व्हिडीओ पाहून नेटकरी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक, तर अनेक जण भावुक होताना कमेंटमध्ये दिसून येताहेत. तसेच आशा आहे की, हे खास गाणं ऐकल्यानंतर तुमच्याही मनात अभिमानाची भावना निर्माण होईल, जशी आमच्यामध्ये निर्माण झाली आहे; अशी खास आणि भावनिक कॅप्शन या गाण्याला मुंबई पोलिसांनी दिली आहे.

काही तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांहून जास्त जणांनी पाहिलंय. तर 16 हजारांहून अधिक लाईक्स मिळालेत. या व्हिडिओवर लोकांच्याही अनेक प्रतिक्रिया आल्यात, एका तर युझरने मुंबई पोलिसांचं काम चांगले आहे. मी मुंबईकर असल्याचा गर्व आहे असं लिहिलंय तर दुसऱ्याने गाण्यातील प्रत्येक शब्दावरून मुंबई पोलिसांची किर्ती ऐकायला मिळते. असं म्हटलंय, हे गाणे ऐकून भारी वाटतंय, असंही काही जणांनी लिहिलंय. 

हेही वाचा : Konkan MHADA Lottery : 5311 कोकणवासियांना मिळालं हक्काचं घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी