33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
HomeराजकीयMaratha Reservation : "अट्टहास सोडा, जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नका",...

Maratha Reservation : “अट्टहास सोडा, जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नका”, फडणवीसांचं जरांगेंना आवाहन

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि शिंदे सरकार यांच्यातील मतभेद वाढतच चालले आहेत. जरांगे पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचंही मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे. असं असताना मागील काही दिवसांपासून जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलनातील सहकारीच बोलताना दिसत आहेत, अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “आता मनोज जरांगे पाटील यांनी अट्टाहास सोडावा.” (Maratha Reservation)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचे आरक्षण काढणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट केले होते. ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवत मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे. त्यामुळे ओबीसी समाजात समाधान तर मराठा समाजात आनंद व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता जरांगेंनी अट्टहास सोडावा”, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

“मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिले आहे. त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असे आंदोलन करू नये. जरांगे पाटील यांना याबाबत सांगण्यात आले असून त्यांनी आता आंदोलनाचा अट्टाहास सोडावा. आरक्षणाबाबत न्यायालयाने काय म्हटले मला माहिती नाही”, असेही देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना सांगितलं आहे. 

मराठा आरक्षणासाठी शनिवारी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करत आहे, त्याविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला. यावर जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका करताना असं म्हटलं आहे की, ”राज्य सरकार हतबल असून, न्यायालयाच्या खांद्यावरून गोळीबार करत आहे, असा आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे  पाटील यांनी उच्च न्यायालयात शुक्रवारी केला. 

“एकीकडे ते आंदोलकांना भेटतात आणि दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशाचा शस्त्र म्हणून वापर करतात. आज राज्यभरात शांततेत आंदोलन करण्यात येईल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही”, असे आश्वासन मनोज जरांगे – पाटील यांच्या वतीने ॲड. व्ही. एम. थोरात यांनी न्या. अजय गडकरी व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाला दिले.

हेही वाचा : नाशिक संघटनेची ध्येयधोरणे समजून संघटना वाढीसाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करा- करण गायकर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी