33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमुंबईममता कुलकर्णी ड्रग्स प्रकरणाची कागदपत्रे झाली गहाळ

ममता कुलकर्णी ड्रग्स प्रकरणाची कागदपत्रे झाली गहाळ

बॉलिवूडची अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने उच्च नायायालयात दाखल केलेल्या ड्रग्स प्रकरणासंबंधीची कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. २०१६ साली ड्रग्स प्रकरणात ममता कुलकर्णी आणि तिच्या नवऱ्याच्या नावे ठाणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ममता कुलकर्णी आणि तिच्या पतीच्या नावावर 2016 मध्ये ठाणे पोलिसांकडून एका आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांनी 2016 मध्ये दोन हजार कोटी रुपयांचा हा ड्रग रॅकेट उघडकीस आणले. (Mamta Kulkarni Drug Case) त्यानंतर ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक चौकशी केल्यानंतर कल्याण येथून एका नायजेरियन ड्रग पेडलरला अटक करण्यात आली. या ड्रग पेडलरने ठाणे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातून पुन्हा दोन तरुणांना अटक करण्यात आली. या दोन तरुणांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात असलेल्या मयूर स्वामी नावाच्या एका फॅक्टरी मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मयूर स्वामीची अधिक चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीनुसार सोलापूरच्या ‘एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक’ या कंपनीवर पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. तेव्हा त्या ठिकाणाहून दोन हजार कोटी रुपये किमतीचे ड्रग्स पोलिसांकडून जप्त करण्यात आले.

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाची अधिक चौकशी केल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. यानंतर ममता कुलकर्णी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तिने या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले. तसेच ममता कुलकर्णीकडून तिच्यावर दाखल झालेला हा गुन्हा रद्द करता यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. 2018 मध्ये ममता कुलकर्णीने ही याचिका दाखल केल्यानंतर ती आणि तिचा पती विकी गोस्वामी हे परदेशामध्ये पसार झाले जे आजपर्यंत भारतात आलेले नाहीत.

दरम्यान, आता या प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. 2018 मध्ये ममता कुलकर्णी हिने या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची कागदपत्रे गहाळ झालेली आहेत. कागदपत्रे गहाळ झालेली असल्याकारणाने मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची सुनावणी देखील थांबवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी करिता ही महत्वाची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत. तर ममता कुलकर्णीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिका संबंधित कागदपत्रांचा शोध सध्या सुरू असून गहाळ झालेली कागदपत्रे लवकरच सापडतील, अशी माहिती निबंधक कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा

संभाजी महाराजांना दुर्लक्षित करणाऱ्या ‘कालनिर्णय’ला उशिराने सुचले शहाणपण !

भारत-पाकिस्तान सामन्याने आमचं आयुष्य बदलून टाकलं; मोहम्मद रिजवानने सांगितली आठवण

एकनाथ शिंदेंनी राजकीय सभेसाठी उधळले 10 कोटी, प्रकरण न्यायालयात!

ममता कुलकर्णी हिने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. ममताने करण-अर्जुन, गँगस्टर, तिरंगा, सबसे बडा खिलाडी अशा चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून अभिनय केलेले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी