32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरमुंबईMumbai News : फोन रिपेअरिंगला दिला अन् बँकेतून 2 लाख गायब झाले!...

Mumbai News : फोन रिपेअरिंगला दिला अन् बँकेतून 2 लाख गायब झाले! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबईत एका व्यक्तीला आपला मोबाईल दुरुस्त करून घेणे इतके महागात पडले की, त्याचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले. मुंबईतील साकीनाका येथे मोबाईल फोन रिपेअरिंग दुकानातील कर्मचाऱ्याने 2 लाखांची फसवणूक केली.

अनेकदा आपण अनोळखी व्यक्तीच्या हातात आपला मोबाईल अगदी सहडपणे सोपावत असतो. मात्र, तो व्यक्ती आपल्या मोबाईलचा वापर करून आपल्या खात्यात असणारी रक्कम चोरी करेल याची आपण कल्पनाही करत नाही. मात्र, अगदी याच गोष्टीची जाणीव करून देणारी घटना महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईत घडली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एका व्यक्तीला आपला मोबाईल दुरुस्त करून घेणे इतके महागात पडले की, त्याचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले. तर, मुंबईतील साकीनाका येथे मोबाईल फोन रिपेअरिंग दुकानातील कर्मचाऱ्याने 2 लाखांची फसवणूक केली. असे काहीसे घडले की, 40 वर्षीय पीडित कदम यांनी मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात दुरुस्त करण्यासाठी मोबाईल दिला होता.

मोबाइल स्टोअरच्या कर्मचाऱ्याने त्याच्या फोनवरील बँकिंग अ‍ॅपवर प्रवेश केला आणि एफडी तोडली आणि त्याचे पैसे त्याच्या खात्यात ट्रान्सफर केले. या संदर्भात पीडितेने पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिस सध्या तपास करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, व्यवसायाने फ्रीलान्सर असलेल्या कदम यांनी सांगितले की, 7 ऑक्टोबरला माझ्या फोनच्या स्पीकरमध्ये काही समस्या आली तेव्हा मी एका स्थानिक फोन दुरुस्तीच्या दुकानात गेलो. स्टोअरच्या कर्मचाऱ्याने मला माझे सिम कार्ड फोनमध्ये सोडण्यास सांगितले. मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 8 ऑक्टोबर रोजी माझा हँडसेट घेण्यासाठी गेलो तेव्हा मला दुकान बंद असल्याचे दिसले. 9 आणि 10 ऑक्टोबरलाही दुकान बंद ठेवण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : मंत्रीमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

Amravati Railway Accident : अमरावतीत रेल्वे अपघात! गाडीचे 20 डबे रुळावरून घसरले

WhatsApp : भावा वैताग आलेला नुस्ता…! व्हाट्स अ‍ॅप गंडलं होतं…..

पोलिसांच्या एफआयआरनुसार, यानंतर 11 ऑक्टोबरला मोबाईल दुरुस्तीचे दुकान उघडण्यात आले मात्र तेथे दुसरा कर्मचारी दुकान चालवत होता. कदम यांनी त्यांचा फोन आणि सिमकार्ड मागितले मात्र कर्मचाऱ्याने काही तरी निमित्त केले. काहीतरी गडबड झाल्याचा संशय आल्याने कदम यांनी मित्राशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कदम यांनी त्यांचे बँकिंग अ‍ॅप वापरले.

कदम यांनी त्यांच्या खात्यात लॉग इन केल्यावर त्यांच्या संवेदना उडाल्या. त्याची एफडी मोडली असून २.२ लाख रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाल्याचे त्याला आढळले. यानंतर पीडित कदम यांनी पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. मात्र, आपला फोन इतरांना हाताळण्यासाठी देत असताना योग्य ती काळजी घ्यायला हवी असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!