32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमुंबईमुंबई पोलिसांची हजारो पदे रिक्त

मुंबई पोलिसांची हजारो पदे रिक्त

मुंबई शहराचा कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासठी मुंबई पोलिसांची भूमिका फर महत्वाची आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अप्पर पोलिस पदापासून तसेच आयुक्त पदापर्यंत ते शिपाई पदापर्यंत तब्बल १२ हजार ८९९ पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहेत. गलगली यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती घेण्यात आली. मुंबई पोलिसांनी गलगली यांना ३० नोव्हेंबरपर्यंत माहिती दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज केला आहे. सध्या असलेले मुंबईतील पोलिस शिपाई आणि इतर अधिकाऱ्यांचे सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांबाबत माहिती जाणून घेतली आहे. मुंबई पोलीस आयुक्तलयांचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद कांबळे यांनी अनिल गलगली यांस ३० नोव्हेंबरची माहिती दिली. यात एकूण मंजूर पदांची संख्या ५१३०८ आहेत. यात १२८९९ पदे रिक्त असून ३८४०९ कार्यरत पदे आहेत.

पोलिस शिपाई सर्वाधिक रिक्त पदे

पोलिस शिपाईंची एकूण २८ हजार ९३८ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी १७ हजार ८२३ कार्यरत पदे आहेत तर ११ हजार ११५ पदे रिक्त आहेत. अशातच पोलीस उपनिरीक्षकांची ३ हजार ५४३ पदे मंजूर करण्यात आली असताना यातून केवळ २ हजार ३१८ कार्यरत पदे आहेत. अशातच १ हजार २२५ पदे रिक्त करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षकांची १ हजार ९० पदे मंजूर आहेत. यापैकी ३१३ पदे रिक्त असून सद्या ९७७ कार्यरत पदे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांची १४१ पैकी २९ पदे रिक्त आहेत. पोलीस उपायुक्तांची ४३ पदे मंजूर असून ३९ पदे कार्यरत आहेत. यात ४ पदे रिक्त आहेत. तर अप्पर पोलीस आयुक्त यांचे १२ पैकी फक्त १ पदे रिक्त आहेत.

हे ही वाचा

‘२४ ऐवजी २२ तारखेला तपासणीसाठी बोलवा’

‘छाताडात गोळ्या घातल्या तरीही मागे हटणार नाही’

शोएब मलिक अडकला दुसऱ्यांदा लग्नबंधनात, सानिया मिर्झानंतर ‘या’ तरूणीशी थाटला संसार

काय म्हणाले गलगली?

‘दरवर्षी सेवानिवृत्ती मुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. मंजूर पदे ही पूर्वीपासून असून यात काही बदल झाला नाही. रिक्त पदे भरत असताना मंजुर पदांची संख्या वाढवली तर मुंबई पोलिसांवर सध्या प्रचंड ताण आहे. यामुळे तो ताण कमी करण्यासाठी मोठी मदत होईल’, असा दावा गलगली यांनी केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी