28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्र'छाताडात गोळ्या घातल्या तरीही मागे हटणार नाही'

‘छाताडात गोळ्या घातल्या तरीही मागे हटणार नाही’

अनेक दिवसांपासून मराठा समाज सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र सरकार याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. अशातच आता मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे आपल्या अंतरवाली सराटीतून मुंबईला पायी कुच करत आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावर ते आरक्षणाची मागणी करणार असून ते उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी याआधी दिली आहे. यामुळे आता मी मरल जगल माहित नाही, अशी हळहळ व्यक्त केली. मात्र मराठा आरक्षणापासून मागे हटणार नाही. माझ्या छाताडात गोळ्या घातल्या तरीही मी मागे हटणार नसल्याचं ते माध्यमांशी संवाद साधत असताना म्हणाले आहेत.

मनोज जरांगे भावूक

अंतरवाली सराटीतून मुंबईला आजपासून मनोज जरांगे पाटील हे पायीवारी करत मराठा आंदोलकांसोबत येणार आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मराठा समाजाने गेली ७ महिने सरकारला आरक्षणासाठी वेळ दिला आहे. आता छातीत गोळ्या घातल्या तरीही मागे हटणार नाही. मी समाजासाठी बलिदान द्यायला तयार आहे. २६ जानेवारी पासून मनोज जरांगेंचं मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन असणार आहे. यामुळे घराघरातील मराठा बांधवांनी मुंबईला यावं’, असं आवाहन केलं आहे.

हे ही वाचा

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला राज्यामध्ये शाळांना सुट्टी

‘वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा’, रत्नागिरीत राजन साळवींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

२४ जानेवारी दिवशी रोहित पवारांची ईडीकडून चौकशी होणार

‘तुमच्यात मी असेल नसेल मला माहिती नाही’

‘मराठ्यांची एकजूटता फुटू नये. मी तुमच्यात असेल नसेल मला माहिती नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही. आपली मुलं संपली पाहिजे असं त्यांना वाटत आहे. आपली मुलं संपावी असा घाट त्यांनी का घातला आहे? आमच्या नोंदी सापडूनही हे आरक्षण देत नाहीत. आमचं आंदोलन हे सहज घेत आहेत’. असं म्हणत असताना जरांगे-पाटील भाऊक झाले आहेत.

आमरण उपोषण करत अंतरवाली सराटीला चालत जाणार

मुंबईला जात असताना मनोज जरांगे माध्यमांशी बोलत असताना भाऊक झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी ते बोलत असताना ‘सराकर इतकं निर्दयी कसं आहे. माऊल्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं तरीही हे सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे. त्यामुळे मी रात्रीपासून व्यथीत झालो’, असं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी ते म्हणाले की मात्र ‘आता स्वप्न पूर्ण करायचं आहे. यामुळे मी आता अंतरवाली सराटीला आमरण उपोषण करत पायी जाणार आहे’.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी