देशामध्ये काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. याचीच सध्या पूर्वतयारी होत आहे. पुन्हा एकदा ईडीचा वापर करून आमदार आणि काही खासदारांना उरलेला शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट फोडण्याचं आयोजन सध्या सत्ताधाऱ्याकडून होत असल्याच्या चर्चा होत आहेत. निवडणुकांचा वेध घेता. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने (ED) धाड टाकली. तर मुंबईमध्ये काही कार्यालयात तपास देखील केला. तसेच आता २४ जानेवारी दिवशी ईडीने रोहित पवार यांना तपासासाठी उपस्थित राहण्याचं समन्स पाठवलं आहे. यावर रोहित पवार यांनी २४ जानेवारी नाहीतर २२ जानेवारी दिवशी तपास करा अशी विनंती केली आहे.
ईडीने २२ जानेवारी दिवशी रोहित पवार यांच्या तपासासाठी समन्स पाठवलं आहे. मात्र २२ जानेवारी दिवशी तसेच २३ जानेवारी दिवशी ईडीने तपास करावा अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे. १९ जानेवारीला रोहित पवारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले. त्यांनी ट्विट करत ही माहिती ‘x’ अकाऊंटवर शेअर केली आहे. रोहित पवार हे चौकशीला हजर राहणार आहेत. मात्र रोहित पवार यांच्या विनंतीला मान मिळणार का? हे पाहणं गरजेचं असणार आहे.
हे ही वाचा
‘छाताडात गोळ्या घातल्या तरीही मागे हटणार नाही’
शोएब मलिक अडकला दुसऱ्यांदा लग्नबंधनात, सानिया मिर्झानंतर ‘या’ तरूणीशी थाटला संसार
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला राज्यामध्ये शाळांना सुट्टी
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांच्यावर १९ जानेवारीला ईडीने २४ जानेवारीला तपासासाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे. यावर रोहित पवार यांनी २४ ऐवजी २२ तसेच २३ जानेवारीला उपस्थित राहण्याबाबत विनंती केली आहे. ‘ईडीच्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन/मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो, परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील. म्हणूनच ईडीला विनंती केलीय की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर २४ तारखेऐवजी २२ किंवा २३ तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, ही विनंती मान्य केली जाईल’.
#ED च्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन/मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो, परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 19, 2024
‘पक्ष आणि घरं फोडण्यासाठी यंत्रणांचा वापर’
रोहित पवारांवर केलेल्या ईडीच्या कारवाईनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ‘पक्ष आणि घरं फोडण्यासाठी यंत्रणांचा वापर केला गेला आहे. मला फार विशेष वाटत नाही. सीबीआय, ईडी. इनकम टॅक्स अशा यंत्रणांचा वापर करून पक्ष आणि घरं फोडण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणतात, महाराष्ट्र राज्य हे अदृश्य शक्ती चालवतं. अदृश्य शक्ती महाराष्ट्रातील जनतेच्या विरोधात कटकारस्थान करत आहे. यामध्ये यंत्रणांची चूक नाही’.