भारत असो वा पाकिस्तान हे दोन्ही देश फार काही वेगळे नाहीत. भारतातील एक भाग म्हणजे पाकिस्तान आहे. अशातच आता सर्वत्र लग्नाचा ऋतु आहे. या दोन्ही देशांमध्ये देखील सध्या लग्नसमारंभ होत आहेत. अशातच काही दिवसांआधी भारतात अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान यानं देखील लग्नगाठ बांधली आहे. अशातच आता पाकिस्तानी माजी क्रिकेटर आणि भारताचा जावई शोएब मलिकने (Shoaib Malik) आता तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. भारतीय टेनिसपटू शोएब मलिकची पत्नी सनिया मिर्झा (Sania Mirza) यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र तिचा पती शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्रीशी लगीनगाठ बांधली आहे.
काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात अनेकदा खटके उडाल्याच्या चर्चा होत्या. अनेकदा सानियाने आपल्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. यावरून केवळ अंदाज लावला जात होता. तिनं काही दिवसांआधी लग्न करणं कठीण आहे, घटस्फोट घेणं कठीण आहे. अशी भावना तिनं व्यक्त केली होती. अशातच आता शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी विवाह केला आहे. शोएबने आपल्या सोशल मीडिया हॅंडेलवर पोस्ट शेअऱ करत माहिती दिली आहे.
View this post on Instagram
हे ही वाचा
‘छाताडात गोळ्या घातल्या तरीही मागे हटणार नाही’
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला राज्यामध्ये शाळांना सुट्टी
‘वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा’, रत्नागिरीत राजन साळवींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
कोण आहे सना जावेद?
शोएब मलिकने विवाह केलेली मुलगी सना जावेद असून ती एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. अनेक दिवसांपासून सना आणि शोएबच्या अफेअरच्या चर्चा होत्या आणि सानिया मिर्झासोबत घटस्फोटाच्या चर्चा आहेत.
शोएबने सना जावेदशी लग्नगाठ बांधल्याने चाहत्यांना धक्का दिला आहे. काही दिवसांपासून शोएब आणि सना यांच्यात डेटींग सुरू होतं. शोएबने सनाच्या वाढदिवशी तिला शुभेच्छा दिल्या. तिच्यासोबत एक फोटोदेखील शेअर केला आहे. सना ही २८ वर्षीय असून तिचा देखील घटस्फोट झाला आहे. ती अनेकदा पाकिस्तानच्या टिव्ही शोमध्ये दिसली आहे.