28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमुंबईमुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर धावली बस; शिंदे-फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर धावली बस; शिंदे-फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा मुबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) रोड पुर्णत्वाला आला असून आज या सहा पदरी मार्गावरुन बस धावली. या बसला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला. एमटीएचएल हा 22 किमी लांबीचा मार्ग असून यावर 16.5 किमी लांबीचा सागरी सेतू आहे. हा पुल आज मुंबई आणि नवी मुंबईच्या बाजूने जमीनीशी जोडण्यात आला. या मार्गावरुन एमटीएचएलच्या अभियंत्यांना आणि कर्मचाऱ्यांना घेऊन एक बस धावली.

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा सागरी सेतू आहे. या मार्गामुळे मुंबईतील वाहतूक कोडी कमी करण्यासाठी मदत होणार असून मुंबई परिसराचा विस्तार देखील वाढणार आहे. नवी मुंबई, पुणे या शहरांतून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग महत्त्वाचा असून भविष्यात नवी मुंबईच्या विकासासाठी हा मार्ग महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून एमटीएचएलची ओळख निर्मान झाली आहे. येत्या नोव्हेंबर पर्यंत सर्वसामान्यांसाठी हा मार्ग खुला करण्यात येणार आहे. या मार्गावर अध्ययावत टोल प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरा अशा काही सोई सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.

प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका २ आपात्कालीन मार्गिका) पुलाचा समावेश आहे.

• या पुलाची समुद्रातील लांबी + सुमारे १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे.
• या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील (mainland) शिवाजी नगर व राष्ट्रीय महामार्ग-४ब वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल (Interchanges) आहेत.
• प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

हे सुद्धा वाचा

‘चोर’टेगिरी आली चित्रा वाघ यांच्या अंगलट !

आईचं कलेक्टर होण्याच स्वप्न अधुरे राहिले: मुलाने युपीएससीत मिळवले दमदार यश

भारतीय आयटी कंपन्यांचे कॅम्पस हायरिंग 40 टक्क्यांनी घटणार!

प्रकल्पाचे फायदे :
• नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा भौतिक व आर्थिक विकास.
• प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पार्ट यांचे दरम्यान वेगवान दळणवळण शक्य.
• मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-गोवा महामार्ग यांमधील अंतर सुमारे १५ किमी कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एका तासाची बचत
• मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार.

प्रकल्पाची वैशिष्ठ्ये :
• हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा आणि जगभरातील १० व्या क्रमाकांचा पाण्यावरील समुद्रावरील पूल ठरणार आहे.
• ऑर्थोोट्रॉपीक स्टील डेक (Orthotropic Steel Deck DSD) पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा भारतात प्रथम वापर
• सुमारे ५०० बोईंग ७४७ विमानांच्या वजनाइतका म्हणजेच सुमारे ८५ हजार मेट्रीक टन ऑयोट्रॉपीक स्टील चा प्रकल्पात वापर.
• सुमारे १७ आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजेच सुमारे १ लाख ७० हजार मेट्रीक टन वजनाच्या स्टीलच्या सळयांचा प्रकल्पात वापर.
• पृथ्वीच्या व्यासाच्या ४ पट म्हणजेच सुमारे ४८ हजार किमी लांबीच्या प्रिस्ट्रेसींग वायर्सचा वापर
• स्टैचू ऑफ लिबर्टीच्या पुतळ्याकरीता वापरण्यात आलेल्या काँक्रीटच्या सहा पट म्हणजेच सुमारे ९ लाख ७५ हजार घनमीटर काँक्रीटचा वापर.
• बुर्ज खलिफाच्या ३५ पट उंचीच्या म्हणजेच सुमारे ३५ किमी लांबीच्या पाईल लाइनर्सचा वापर.

• सद्य:स्थितीत स्थापत्य कामांची सर्वसाधारण भौतिक प्रगती इतकी ९४% असून सर्वसाधारण आर्थिक प्रगती ९३% इतकी आहे.
• प्राधिकरणामार्फत प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात आले असून मच्छिमारांना शासनाच्या धोरणानुसार नुकसानभरपाई देण्यात आली आहे व देण्यात येतही आहे.
मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत मुंबई ते मुख्य भूमीची प्रत्यक्ष जोडणी

• मुंबई पारबंदर प्रकल्पातील पॅकेज १ व पॅकेज २ मधील प्रत्येकी ६५ ते १८० मी. लांबीच्या एकूण ७० गाळ्यांची उभारणी ऑर्थोोट्रॉपीक स्टील डेक (Orthotropic Steel Deck OSD ) पद्धतीच्या सुपरस्ट्रक्चरने करण्यात आली आहे.
• या गाळ्यांची उभारणी दिनांक ९ मे २०२३ रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. प्रकल्पाच्या सुमारे २२ किमी लांबी मधील पॅकेज १, २ व ३ अंतर्गत कांक्रीटच्या गाळ्यांची उभारणी पूर्ण होत आहे.

• अशाप्रकारे पुलाचे मुंबई ते मुख्यभूमी (mainland) पर्यंतचे जमिनीवरील तसेच समुद्रातील बांधकाम पूर्ण होणार आहे व मुंबई ते मुख्य भूमीच्या (mainland) थेट जोडणीचे काम पूर्ण झाले आहे.
• मुंबई पारबंदर प्रकल्पातील सर्व गाळयांच्या उभारणीचे वैशिष्ट्यपूर्ण व आव्हानात्मक बांधकाम पूर्ण होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी