33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeमुंबईNarendra Patil : 'हिंदुंना अशा पद्धतीने लक्ष्य केले जात असेल तर आम्ही...

Narendra Patil : ‘हिंदुंना अशा पद्धतीने लक्ष्य केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही’

जिहादी कारवाया वाढत असल्यामुळे हिंदूमध्ये सध्या असुरक्षिततेची भावना पुन्हा घर करू लागली आहे त्यामुळे त्यांच्या न्यायासाठी पुढाकार घेत नवी मुंबई येथे छत्रपती शिवाजी चौकात हिंदूंच्या प्रश्नांवर आवाज बुलंद करत बेलगाम हिंदूविरोधी कारवायांचा निषेध व्यक्त करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

राज्यात हिंदूंचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे दिसून येत आहे. जिहादी कारवाया वाढत असल्यामुळे हिंदूमध्ये सध्या असुरक्षिततेची भावना पुन्हा घर करू लागली आहे त्यामुळे त्यांच्या न्यायासाठी पुढाकार घेत नवी मुंबई येथे छत्रपती शिवाजी चौकात हिंदूंच्या प्रश्नांवर आवाज बुलंद करत बेलगाम हिंदूविरोधी कारवायांचा निषेध व्यक्त करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत आज आंदोलन करण्यात आले. “पाच – सहा महिन्यांतच अपहरण, खून बलात्कारासारख्या इतक्या घटना झाल्या आहेत जे हिंदू समाज फारवेळ सहन करणार नाही, यावर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”, असे म्हणून पाटील यांनी यावेळी जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, राज्यात आता हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. हिंदुंना अशा पद्धतीने लक्ष्य केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे कुठल्याच हिंदुंनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे गुन्हे करणाऱ्यांनी जास्त मस्ती करण्याचा प्रयत्न करू नये, लक्षात ठेवा आता राज्यात हिंदुत्त्ववादी सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रकरणांवर बारीक लक्ष आहे. तरीही कोणी हिंमत केलीच तर सर्व प्रकारचे औषध या हिंदुत्ववादी सरकारकडे आहे, असे पाटील यांनी यावेळी दरडावले.

यावेळी बोलताना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे नरेंद्र पाटील यांनी यावेळी स्वागत केले आणि देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या या संस्थेवर वेळीच कारवाई केल्याचे म्हणत त्यांनी समाधान सुद्धा व्यक्त केले. यावेळी बोलताना पाटील यांनी आवर्जून उल्लेख करताना अशा प्रकारचे गुन्हे किती गंभीर स्वरुपाचे आहेत याकडे सुद्धा लक्ष वेधून घेतले.

हे सुद्धा वाचा…

Annu Kapoor Fraud Case : अभिनेते अन्नू कपूर यांना चोरट्याने फसविले

Ajit Pawar : ‘…तो पर्यंत पक्ष संपत नसतो,’ अजित पवार भडकले

CBSE Board Exam 2023 : सीबीएसई बोर्ड परीक्षेची तारीख जाहीर, वाचा सविस्तर…

या संपुर्ण परिस्थितीवर भाष्य करताना पाटील म्हणाले, पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेचा महाराष्ट्रातही घातपात घडविण्याच्या कट असल्याचे समोर आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रासह पुणे मुंबई महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी तो वेळीच हाणून पाडला. देशविघातक कृत्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे मनसुबे राज्यात कधीच यशस्वी होणार नाही. त्यामुळे एकप्रकारे पीएफआय वरील बंदीचे समर्थन करत केंद्र सरकारचे निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दुसऱ्या घटनेचा उल्लेख करताना नरेंद्र पाटील म्हणाले, नवी मुंबईतील सीवूडमध्ये असलेल्या बेथेल गस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट चर्चच्या अनधिकृत आश्रम शाळेवर महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वी धाड टाकली होती. त्यावेळी या कारवाईत तेथून तब्बल 45 मुला – मुलींची सुटका केली होती. यापैकी तीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले होते. ही घटना ताजी असतानाच आता याच बेथेल गस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमधील आणखी तीन मुलींवर लैगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे त्यामुळे हा प्रकार गंभीर असल्याचे म्हणत त्यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.

त्याहीपेक्षा वाईट म्हणजे मुलीच्या अंगाला विक्स आणि तेल लावणे तसेच त्यांना गुंगीची गोळी देऊन झोपवून ठेवले जात होते, असे यावेळी मुलींनी त्यांच्या जबाबात सांगितले आहे. यातील एका मुलीचा गर्भपात देखील केल्याची धक्कादायक माहिती सुद्दा समोर आली आहे. इतकं सारं घडलेलं असताना देखील अद्याप अजून पाहिजे तशी ठोस कारवाही झालेली दिसत नाही त्यामुळे या बाबत प्रशासनाने ठोस असा निर्णय घेऊन अनधिकृत आश्रम तात्काळ बंद करावा नाहीतर हा समाज रस्त्यावर उतरेल असे यावेली पाटील यांनी निक्षून सांगितले आहे.

आणखी एक प्रसंगाबाबत नरेंद्र पाटील यांनी लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये आमच्या राज्यातील हिंदू धर्मातील अल्पवयीन मुलींना प्रेमाचा बनाव करून फुस लावून त्यांचे बळजबरीने धर्मांतरण करून निकाह केला जातो त्यांचा छळ केला जातो, याविरोधात सुद्धा लढा तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, एका अल्पवयीन मुलीने आंतरजातीय विवाह केला मात्र विवाहानंतर धार्मिक रीतीरिवाज पाळत नाही आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मीय लग्न केलेल्या पतीने पत्नीची गळा चिरून भर रस्त्यात हत्या केली, हे दुखःद असल्याचे पाटील यांनी म्हटले.

सदर घटना चेंबूर येथे घडली असून या घटनेत सदर पीडितेचा या हल्ल्यादरम्यान मृत्यू झाला आहे. मी कधी अशी घटना पाहिली नाही असे म्हणून लवकरच त्या मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगतले आहे. यावेळी  पोक्सो संदर्भात कारवाई अजून का झाली नाही असे म्हणून अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत हा गुन्हा नोंद करावा असे पाटील यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे.

राज्यातील या संपुर्ण प्रकरणांचा वेध घेत असताना नरेंद्र पाटील म्हणाले, महाराष्ट्रात अंधश्रध्देचा कायदा असताना देखील फादर, पास्टर यांच्याकडून मी थेट येशूशी बोलतो, आजार बरे करतो, केवळ येशूची पूजा करा हात लाऊन फुंक मारून कॅन्सर सारखे, कोरोना सारखे आजार बरे केले जातात समाजाची ह्या लोकांकडून दिशाभूल करून लूट केली जाते आणि त्या माध्यमाने धर्मांतरण केले जाते असे म्हणून त्यांनी जिहादमागचे कारण उलगडण्याचा प्रयत्न केला.

आरक्षण ही व्यवस्था हिंदू समाजातील घटकांना आहे. shedule कास्ट मध्ये जे लोक येतात अनुसूचित जातीचा नावे सरकारी नोकऱ्या मिळवतात आरक्षणाचा फायदा घेतात अशा सर्व प्रकरणाची शासन चौकशी करणार आहे. ज्या लोकांनी कागदावरती हिंदू म्हणून नोकऱ्या मिळविल्या पण व्यवहार उपासना पद्धत ख्रिश्चन आणि मुस्लिम आहेत अशा किती लोकांनी शासकीय नोकऱ्या मिळवल्या या बाबत शासन चौकशी करणार आहे आणि मी स्वतः या बाबत पाठपुरावा शासन दरबारी करणार असे सुद्धा पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, यावेळी पंडित महाराज वरपे, सतिश निकम, मनीषा भोईर, प्रफुल पिसाळ,संतोष अडांगळे, नितीन मोरे, सुरेश सिंग राणा यांनी लव्ह जिहाद, अनधिकृतरीत्या केले जाणारे धर्मांतरण हिंदू विरोधी कारवाया, देवी देवतांची विटंबना आणि इतर हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करीत उपस्थित जनसमुदायास संबोधित केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी