29 C
Mumbai
Monday, May 8, 2023
घरमुंबईपनवेल-इंदापूर सिंगल लेन मेपर्यंत पूर्ण करणार : रविंद्र चव्हाण

पनवेल-इंदापूर सिंगल लेन मेपर्यंत पूर्ण करणार : रविंद्र चव्हाण

मुंबई गोवा हायवेचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल आहे. गोवा ते राजापूर हा रस्ता झाला आहे. मात्र, पनवेल- इंदापूर रस्त्याचं काम रखडल होत. त्यावर आता मार्ग काढण्यात आला असून पनवेल-इंदापूर रस्त्यावर सिंगल लेन तरी मे 2023 पर्यंत पूर्ण करण्याची आमची आशा असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं आणि तसा विश्वास देखील व्यक्त केला आहे. (Panvel-Indapur single lane to be completed by May: Ravindra Chavan)

मुंबई गोवा हायवे मार्ग हा सर्व कोकण वासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय. मात्र , हा काही केल्या पूर्ण होत नव्हता. आता गोवा ते राजपूर हा मार्ग पूर्ण झाला आहे. मात्र, पनवेल -इंदापूर हा पट्टा रखडला आहे. याची अनेक कारण आहेत. जमिनी बाबत कोर्ट कचेऱ्या झाल्या. कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हता, अशा अनेक अडचणी होत्या. मात्र, त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्ग काढला आहे.

या रस्त्याबाबत सोमवारी बैठक होणार आहे. या कामाचा कॉन्ट्रॅक्टर ही काम करत नव्हता. त्याला ही काढून टाकण्यात आलं आहे. नवा कॉन्ट्रॅक्टर नेमण्यात आला आहे. वन खात्याच्या सर्व परवानग्या मिळवल्या आहेत. पुलाची सर्व काम सुरुवात झाली आहे.त्यामुळे या मार्गावर सिंगल लेन तरी आम्ही सुरू करू, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : 

मंत्री रवींद्र चव्हाण फुलवणार ‘गुलाब’ !

कोकणच्या पर्यटनासाठी मंत्री रवींद्र चव्हाणांचा बूस्टर

राजकारण विकासाचे, महाराष्ट्राच्या प्रगतीचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष लेख)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी