27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमुंबई'मुंबईचे लोकलप्रवाशी शिवपंख लावणार, अन् कामावर उडत उडत जाणार', मनसेने सांगितले भाकीत

‘मुंबईचे लोकलप्रवाशी शिवपंख लावणार, अन् कामावर उडत उडत जाणार’, मनसेने सांगितले भाकीत

टीम लय भारी

मुंबई :- सोमवारी ‘आमचे सीएम जगात भारी’ अशी ठाकरे सरकारवर उपरोधित टीका करणाऱ्या मनसेचे सरचिटणीस व प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारला टोला हाणला आहे. ‘शिवपंख लावून द्या, लोक कामाला उडत येतील’ अशा खोचक पण गंमतीशीर भाषेत त्यांनी वक्तव्य केले आहे (Put on Shivpankh people will come to work said MNS).

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन लस घेतलेल्यांना लोकल सेवा सुरू करावी हा विषय ताणून धरला आहे. तर दुसऱ्या बाजूला, सोमवारी राज्य सरकारने निर्बंध शिथिल करून, नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत दुकाने आणि मॉल वेळ वाढवून दिल्याने दिलासा मिळाला आहे. पण, या शिथिल केलेल्या निर्बंधात लोकल सेवा सुरू करण्याबाबत काही उल्लेख नसल्याने, मनसेचे सरचिटणीस देशपांडे यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडविली आहे.

“आमचा सीएम जगात भारी”, मुख्यमंत्र्यांवर मनसेचा खोचक पण मजेशीर टोला

शरद पवार दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार

‘सी.एम साहेब आपण सगळ्या आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत, बसला प्रचंड वेळ लागतो, गर्दीही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण शिवपंख लावून दिलेत तर त्यांना कामाला उडत उडत येता येईल आणि, त्रास ही होणार नाही. मला खात्री आहे, आपण हे करू शकता. ‘आमचा सीएम जगात भारी’ असे ट्विट त्यांनी केले आहे (Our CM is heavy in the world he tweeted).

राहुल गांधींनी इंधन दरवाढीविरोधात दिल्लीत काढली सायकल रॅली

‘Our CM best in world’: MNS leader’s jibe at Uddhav Thackeray for not starting local services

Put on Shivpankh people will come to work said MNS
मुंबई लोकल

महाराष्ट्रातील संसर्गदर कमी झाल्याने सोमवारी सरकारने 22 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले. राज्य सरकारने या संदर्भात सुधारित नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दुकाने, मॉल आता रात्री 10 वाजे पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, सामान्य माणसांसाठी लोकल सेवा अद्याप सुरू झालेली नाही. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, हा विषय मनसेने नेहमी राज्य सरकारसमोर मांडत आहे. परंतु या विषयावर सरकार दुर्लक्ष्य करीत असल्यामुळे, मनसे राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिके विरोधात पुन्हा पुन्हा मजेशीर पण तेवढीच खोचक टीका करीत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी