35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकरांना आनंददायी बनविण्यासाठी पोलीस आयुक्त आले रस्त्यावर !

मुंबईकरांना आनंददायी बनविण्यासाठी पोलीस आयुक्त आले रस्त्यावर !

टीम लय भारी 

मुंबई: बदलत्या जीवनशैलीमुळे ताण निर्माण होतो. लोकांचा हा मानसिक ताण कमी होण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक अभिनव उपक्रम राबवला आहे. मोकळ्या रस्त्यावर उतरून सायकल, योगा आणि स्केटींग तसेच इतर सांस्कृतिक उपक्रमांचा लाभ घेता यावा यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून दर रविवारी ‘संडे स्ट्रीट’ #SundayStreets  हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

रविवारपासून सकाळी ६ ते १० एकेरी मार्गावरती मुंबईतील १३ मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. Mumbai police have launched a ‘Sunday Street’


मुंबईकर आता प्रत्येक रविवारी ‘संडे स्ट्रीट’ #SundayStreets या उपक्रमाचा आनंद घेणार आहे. सदर उपक्रमासाठी प्रत्येक रविवारी पहाटे ६ ते १० ही वेळ राखून ठेवला जाणार आहे. त्याकरिता मुंबईतील ठरावीक रस्त्यांची निवड करण्यात आली आहे.

या वेळेत काही रस्त्यांवरील एकेरी वाहतूक किंवा काही रस्त्यांवर पूर्ण वाहतूक बंद ठेवून ते लोकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. Mumbai police have launched a ‘Sunday Street’

या रविवारी मरीन ड्राइव्ह येथे पोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी स्वत: नागरिकांसोबत सायकलिंग केली. मुंबईकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मुंबई पोलिसांनी ही फेसबुक पोस्ट करत मुंबईकरांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, मुंबईकरांनो #SundayStreets उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आज तुमच्या ओठांवर उमटलेले हास्य हीच आमची प्रेरणा आहे. Mumbai police have launched a ‘Sunday Street’

हे ही वाचा :

https://www.ndtv.com/mumbai-news/mumbai-police-launch-sunday-street-initiative-people-step-out-of-homes-for-fun-time-2845626

दागिने चोरांचा सुळसुळात, सिंगम स्टाईलमध्ये मुलुंड पोलीसांनी चोरांना केले अटक

मेस्मा कायदा म्हणजे नेमके काय ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी