33 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरमहाराष्ट्रतालुक्यात 86 कोटी लाखाच्या निधीतून रस्त्यांचे मजबुतीकरण होणार; आमदार बाळासाहेब थोरातांच्या पाठपुराव्याला...

तालुक्यात 86 कोटी लाखाच्या निधीतून रस्त्यांचे मजबुतीकरण होणार; आमदार बाळासाहेब थोरातांच्या पाठपुराव्याला यश

विकासातून वैभवाकडे वाटचाल करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते व विकास कामांसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांनी सातत्याने मोठा निधी मिळवला असून अर्थसंकल्पातून एकूण 86 कोटी 27 लाख रुपये मिळाला असून यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन मधून 14 कोटी 48 लाख रुपये निधी मिळाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक भाऊ थोरात यांनी दिली आहे.

या निधीबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी मोठा निधी मिळवला आहे यामध्ये अर्थसंकल्पातून राज्यमार्ग करता 8 कोटी प्रजीमा साठी 30 कोटी तर अनेक दिवस मंजुरी होऊन सुद्धा  तांत्रिक मान्यतेसाठी रखडलेल्या तालुक्यातील नान्नज दुमाला सोनोशी मालदाड या रस्त्यासह गुंजाळवाडी राजापूर दरेवाडी कवठे मलकापूर या रस्त्यांसाठी 33 कोटी 79 लाख रुपयांची तांत्रिक मंजुरीसाठी विधानसभेत लक्षवेधी केल्याने ग्रामविकास विभागाच्या मंत्र्यांनी तातडीने मंजुरी देण्याचे मान्य केले आहे.

याच समवेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तळेगाव दिघे ते तालुका हद्द सायाळे या 3 किलोमीटर रस्त्यासाठी 2 कोटी 45 लाख रुपये राष्ट्रीय महामार्ग 50 कोल्हेवाडी ते जोर्वे या 4 किलोमीटर रस्त्यासाठी 3 कोटी 11 लाख रुपये पिंपारणे ते कोळवाडे- शिरापूर या साडेसहा किलोमीटर रस्त्यासाठी 5 कोटी 19 लाख रुपये आणि राजापूर ते राष्ट्रीय महामार्ग चिखली या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी 3 कोटी 73 लाख रुपये असे एकूण 14 कोटी 48 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

या विविध रस्त्यांना तांत्रिक मान्यता मिळाली नाही पावसाळ्यापूर्वी हे कामे सुरू होणार असल्याने तालुक्यात रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण होणार असल्याने दळणवळणासाठी मोठे जाळे निर्माण होत आहे. या नवीन रस्त्यांच्या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळवल्याबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात व सर्व जिल्हा परिषद सदस्यांचे तालुक्यातील सर्व गावांमधील कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

हे सुद्धा वाचा :

सत्यजीत तांबे यांचा नक्की इरादा काय? बाळासाहेब थोरातांच्या मनधरणीनंतर केले सुचक ट्विट

नाना पटोलेंचे कारस्थान कॉंग्रेसच्या मुळावर, बाळासाहेब थोरातांचा राजीनामा !

दुखापतग्रस्त असलेल्या बाळासाहेब थोरातांनी अपघातग्रस्त धनंजय मुंडेंची घेतली भेट

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी