29 C
Mumbai
Thursday, September 7, 2023
घरमुंबईSharad Pawar Health Update : शेर इज बॅक! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना...

Sharad Pawar Health Update : शेर इज बॅक! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना मिळाला डिस्चार्ज

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना तब्बल आठ दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्येत ठिक नसल्यामुळे शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राष्ट्रवादीच्या गोटातून एक दिलासादायक घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना तब्बल आठ दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्येत ठिक नसल्यामुळे शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सकाळी साडे दहाच्या सुमारास पवार मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी परतले आहेत. पोटदुखीच्या त्रासामुळे 30 मार्चला रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांना दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना पित्ताशयात खडे तयार झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याचे निदान झाले होते. दरम्यान, डाॅक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातून शरद पवारांना डिस्चार्ज देण्यासंबंधी डॉ. प्रतीत समदानी यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली होती, त्याप्रमाणे आज पवारांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू होते. डिस्चार्ज नंतर लगेचच शरद पवार यांनी मुंबई येथील निवासस्थान सिल्वर ओक येथे रवाना झाले. तब्येत ठिक नसल्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्यानंतर शरद पवार यांना 31 ऑक्टोबर रोजी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा…

Alia-Ranbir Welcome Baby Girl : रणबीर-आलियाला झाले कन्यारत्न

Andheri East Bypoll Election : निवडणुकीत विजयी होताच ऋतुजा लटकेंचा भाजपला टोला

Narayan Rane : नारायण राणेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

दरम्यान, शरद पवार रुग्णालयात असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. शिर्डीतील शिबिराहून परतल्यानंतर चाचण्या, तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल.

शरद पवारांची लढवय्या म्हणून त्यांना ओळख आहे. वय मोठे असले तरीही एखाद्या तरुणाला लाजवेल अशी त्यांची क्षमता आणि कार्यशैली सगळ्यांनाच ठाऊक आहे. रुग्णालयात दाखल असताना सुद्धा शरद पवार यांनी शिर्डी येथे आयोजित पक्षाच्या शिबिराला हजेरी लावली होती. डाॅक्टरांच्या विशेष पथकासह हेलिकॉप्टरने शिर्डी येथे शिबिरासाठी उपस्थित राहिले. आजारपणामुळे पवारांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता परंतु त्यांनी पाच मिनिटे उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तर उर्वरीत भाषण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी वाचून दाखवले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी