27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
HomeमुंबईSpiceJet offer: अरे व्वा! रेल्वे तिकीटाएवढ्या दरात करता येणार विमान प्रवास...

SpiceJet offer: अरे व्वा! रेल्वे तिकीटाएवढ्या दरात करता येणार विमान प्रवास…

जर तुमचे देखील लहानपणापासून विमानाने प्रवास करायचे स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. तुम्हीसुद्धा  विमान प्रवास अगदी ट्रेनच्या तिकीटाच्या दरात करू शकता. याबाबत अजिबात आश्चर्य वाटण्याची गरज नाही, कारण हे शक्य आहे. एअरलाइन कंपनी स्पाइसजेटने प्रजासत्ताक दिनानिमित्त SpiceJet Republic Day Sale ही खास ऑफर आणली आहे. (SpiceJet offer:Oh wow! Air travel will come at a cost of railway tickets)

स्पाइसजेटने भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय प्रवाशांसाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे. प्रजासत्ताक दिनी रिपब्लिक डे सेलची घोषणा करून केवळ 1,126 रुपयांत तुम्हाला विमानाने प्रवास करता येणार आहे. यात विक्री कालावधी दरम्यान, प्रवाशांना निवडक देशांतर्गत उड्डाणांवर मूळ भाड्यावर 26 टक्के सूट दिली जाईल. या ऑफर अंतर्गत बुक केलेल्या तिकिटांवर तुम्ही 24 जानेवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान विमान प्रवास करू शकता.

स्पाइसजेटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, आता तुम्ही केवळ 1126 रुपयांमध्ये देशांतर्गत विमान प्रवास करू शकता. ही ऑफर 24 ते 29 जानेवारी 2023 पर्यंत सुरू राहणार असून या काळात तुम्हाला तिकीट बुक करावे लागेल. दरम्यान, या ऑफर अंतर्गत बुक केलेल्या तिकिटावर तुम्ही 24 जानेवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रवास करू शकता.

स्पाइसजेट कंपनीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी शिल्पा भाटिया यांनी सांगितले की, या प्रजासत्ताक दिनी विमान कंपनीला आपल्या प्रवाशांसाठी विशेष सेल ऑफर जाहीर करताना आनंद होत आहे. “आमचा प्रजासत्ताक दिन विक्री आमच्या प्रवाशांना त्यांच्या आवडत्या हॉलिडे डेस्टिनेशनवर अविश्वसनीय किमतीत आणि ॲड-ऑन सेवांवर सूट देऊन आगामी लाँग वीकेंड साजरी करण्यासाठी अनेक कारणे देते. ही तिकीट विक्री 30 सप्टेंबरपर्यंत प्रवासासाठी वैध आहे. तुमच्या सुट्ट्यांसाठी आगाऊ आणि कमीत कमी खर्चात लहान ब्रेक्स नक्की अनुभवा, ”शिल्पा पुढे म्हणाली.

हे सुद्धा वाचा : कराची विमानतळ दाऊदच्या ताब्यात

प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या परेडची खासियत जाणून घेऊया

अजित पवार यांना एकनाथ शिंदेंची सरकारी विमान प्रवासाची ऑफर, अनिल देशमुखांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना

एअरलाइनच्या अधिकृत निवेदनानुसार, ही तिकीट विक्री प्रामुख्याने दिल्ली-जयपूर आणि जम्मू-श्रीनगर सारख्या देशांतर्गत गंतव्यस्थानांवर रु. 1,126 (सर्व समावेशी) पासून सुरू होणारे वन-वे भाडे समाविष्ट आहे. या प्रस्तावाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲपद्वारे तिकीट बुक करू शकता. सुविधा शुल्कावर फ्लॅट 26 टक्के सूट आणि स्पाइसमॅक्स, जेवण आणि जागा यासह निवडक ॲड-ऑनवर फ्लॅट 26 टक्के सूट एअरलाइनच्या बुकिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे 26 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस किंवा वर्धापनदिन साजरा करणार्‍या प्रवाशांना 1,000 रुपयांचे मोफत फ्लाइट व्हाउचर जिंकण्याची संधी आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी