29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयअजित पवार यांना एकनाथ शिंदेंची सरकारी विमान प्रवासाची ऑफर, अनिल देशमुखांच्या भेटीसाठी...

अजित पवार यांना एकनाथ शिंदेंची सरकारी विमान प्रवासाची ऑफर, अनिल देशमुखांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज कारागृहातून सुटका होणार असल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आदी नागपूरहून सरकारी विमानाने मुंबईला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पवार यांना प्रवासासाठी सरकारी विमान उपलब्ध करुन दिले आहे. तसेच सांगलीहून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील मुंबईत पोहचणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी अनिल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देणारी सीबीआयची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे अनिल देशमुख य़ांना मोठा दिलासा मिळाला असून आज ते कारागृहातून बाहेर येणार आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते मुंबईत दाखल होत आहेत.

सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. तसेच आज होणारी व्यवसाय सल्लागार समितीची बैठक देखील अजित पवार यांनी उद्या घेण्याची विनंती सरकारकडे केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना बैठकीला उपस्थित राहून सरकारी विमानाने मुंबईला जाण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान देत अजित पवार यांनी देखील या बैठकीला उपस्थिती दर्शविली. त्यानंतर काही वेळाने ते मुंबईकडे रवाना झाले.

 हे सुद्धा वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची तब्बेत खालावली; रुग्णालयात दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहातून बाहेर येणार; सीबीआयची याचिका हायकोर्टाने फोटाळली

सीमाप्रश्नासंदर्भातील ठरावात ‘या’ शहरांचा उल्लेख आवश्यक; अजित पवारांच्या मागणीनंतर दुरुस्ती

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे आज कारागृहातून बाहेर येणार आहेत. मात्र सध्या त्यांना मुंबईबाहेर जाता येणार नाही. त्यामुळे मुंबईला निघण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच पक्षाच्या वतिने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील मी मुंबईला येण्यासाठी सांगितले आहे. काल मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले की व्यवसाय सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे विनंती केली. तसेच मुंबईला जाण्यासाठी सरकारी विमान देण्यासाठी देखील त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर मी माझ्या वेळापत्रकात बदल केल्याचे पवार म्हणाले. तसेच सरकारी विमान कोणी वापरावे याचा अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे. मी विरोधी पक्षनेताही आहे. आम्ही सत्तेत असताना एकमेकांना मदतही करायचो. मी सरकारी विमानात जाऊन आज रात्री परतण्याचा निर्णय घेतला असे अजित पवार म्हणाले.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी