27 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरक्रिकेटIND vs NZ 3rd ODI : भारतीय संघाचे 386 धावांचे न्यूझीलंड समोर...

IND vs NZ 3rd ODI : भारतीय संघाचे 386 धावांचे न्यूझीलंड समोर आव्हान

इंदूर येथील होळकर स्टेडीयमवर आज (मंगळवार दि. 24) (IND vs NZ 3rd ODI) भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्यांच्या एकदिवशीय मालिकेतील अखेरचा सामना होत आहे. या मालिकेतील सलग दोन सामने जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळी केली असून न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. शुभमन गिल, रोहीत शर्मा यांची शतकी खेळी तर हार्दिक पांड्या याने देखील अर्धशतक केले भारतीय संघाने 50 षटकांमध्ये 9 गडी बाद 385 इतक्या धावा केल्या. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचे आव्हान उभे केले आहे. (IND vs NZ 3rd ODI : Indian team’s 386 run challenge against New Zealand)

सलामीला आलेल्या शुभमन गिल (112/78) आणि रोहीत शर्मा (101/85) या दोघांनी आपले शतक झळकवले. त्यानंतर विराट कोहली (36/27), इशान किशन (17/24), सुर्यकुमार यादव (14/9) आणि वॉशिंगटन सुंदर (9/14), शार्दुल ठाकुर (25/17) बाद झाले. तर हार्दिक पांड्याने देखील आपले अर्धशतक झळकावले. त्याने 38 चेंडूमध्ये 54 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादव देखील तीन धावा करुन बाद झाला.

हे सुद्धा वाचा

IND vs NZ 3rd ODI : टीम इंडियाच्या सहा विकेट; हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर मैदानावर

IND vs NZ 3rd ODI : भारतीय संघाची नंबर वनकडे वाटचाल; शुभमन, रोहीत शर्मा बाद, दोघांनीही झळकवले शतक
म्हाडा: घराची 50 टक्के रक्कम भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढ द्या; बाळकुम प्रकल्पातील लाभार्थ्यांची मागणी

आज भारतीय संघ न्यूझीलंडला तिसऱ्या सामन्यात देखील पराभूत करण्याच्या तयारीत आहे. असे झाल्यास भारतीय संघ आयसीसी एकदीवसीय संघांच्या क्रमवारीमधअये नंबर वनवर होणार आहे. इंदूरचे होळकर स्टेडियम भारतीय संघासाठी या आधी तसे लकी ठरलेले आहे. भारतीय संघाने या स्टेडियमवर झालेले सर्व सामने जिंकले आहेत. या मैदानावर भारतीय संघाने इंग्लड, वेस्टइंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेच्या संघांचा पराभव केला आहे. आज देखील भारतीय संघाने फंलदाजी करताना आपली जोरदार खेळी सुरू केली आहे. त्यामुळे भारतीय संघाने ही मालिका जिकंल्यास एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीमध्ये भारतीय संघ अव्वल ठरणार आहे.

असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदिप यादव, उमरान मलिक, युजवेंद्र चहल.

असा आहे न्युझीलंडचा संघ
डेवन कॉन्वे, फिन ऐलेन, हेनरी निकल्स, डेरिस मिचेल, टॉम लेखम (कर्णधार) ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सॅँटनर, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेयर टिकसन

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी