30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमुंबईमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकार गंभीर नाही : प्रवीण दरेकर

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकार गंभीर नाही : प्रवीण दरेकर

टीम लय भारी

मुंबई : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याबाबत राज्य सरकार गंभीर आणि तत्पर नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले. मराठा आरक्षणाच्या संदर्भातील स्थगिती उठवण्यासाठी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल केल्यानंतर ती मेन्शन करणे आवश्यक असते. मात्र अजूनपर्यंत कोर्टात मेन्शन करण्याबाबत राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नसल्याचे दरेकर यांनी सांगितले.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याच्या प्रक्रियेत गती येण्यासाठी राज्य सरकारने यात बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाला गांभीर्याने घेतलेले नाही, असे टीकास्त्र प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर डागले.

अजूनही हे मॅटर कोर्टात मेन्शन झालेले नाही. त्यामुळे हा मॅटर जोपर्यंत मेन्शन होत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया सुरू होऊ शकत नसल्याचे दरेकर म्हणाले. सरकारने या विषयात अधिक जोरदारपणे काम करायला पाहिजे होते. मात्र राज्य सरकार धीम्या गतीने काम करत आहे. त्यावरून राज्य सरकार या विषयात अजिबात गंभीर नाही हे स्पष्ट होते, असे दरेकर म्हणाले.

मराठा आंदोलन जर थांबवायचे असेल आणि समाजाला विश्वास द्यायचा असेल तर याचिका न्यायालयात त्वरित मेन्शन होणे गरजेचे आहे, असा सल्ला दरेकर यांनी राज्य सरकारला दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी