30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजMaratha Reservation : आता दिल्लीच्या तख्तावर मराठा ‘क्रांती’ मोर्चा धडकणार!

Maratha Reservation : आता दिल्लीच्या तख्तावर मराठा ‘क्रांती’ मोर्चा धडकणार!

टीम लय भारी

नाशिक : भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक नाशिकमध्ये झाली. या बैठकीत मराठा आंदोलनाची (Maratha Reservation Protest) पुढील रणनीती आखण्यात आली. येत्या २ ऑक्टोबरला खासदार, आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर राज्य सरकारने मराठा आरक्षण स्थगितीची दखल न घेतल्यास दिल्लीवर क्रांती मोर्चा काढण्यात येईल, (Maratha ‘Kranti’ Morcha to hit Delhi now!) असा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय मराठा समाजाला इडब्लूएसमध्ये आरक्षण नको, या लक्षवेधी ठरावासह २५ महत्त्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले. तसेच मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्त्व करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

मी मराठा समाजाचा सेवक : संभाजीराजे

 

संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही, अशी रोखठोक भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली. छत्रपती संभाजी म्हणून नाही तर मराठा समाजाचा सेवक म्हणून इथे आलोय. कुटुंबप्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. नेतृत्व करण्याचे मी नम्रपणे टाळतो, पण शेवटपर्यंत लढाई लढणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मी तुमच्यासोबत राहणार, असे संभाजीराजे म्हणाले.

यावेळी राज्यभरातील सर्व आमदार, खासदार यांच्या घरासमोर २ ऑक्टोबरला धरणे आंदोलन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर ५ ते १० ऑक्टोबर दरम्यान राज्यात विभागानुसार सर्व तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी