27 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeमुंबई‘तान्हाजी’ चित्रपट बघा स्वस्तात, सरकारच्या निर्णयाचा फायदा

‘तान्हाजी’ चित्रपट बघा स्वस्तात, सरकारच्या निर्णयाचा फायदा

टीम लय भारी

मुंबई : ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे कमी दरांत हा चित्रपट पाहण्याची संधी शिवप्रेमींना मिळेल. मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा असतात. बऱ्याचदा सहकुटुंब चित्रपट पाहताना हा खर्च परवडत नाही. पण आता राज्य सरकारने चित्रपट करमुक्त केल्याने जवळपास अर्ध्या किंमतीत ‘तान्हाजी’ पाहता येणार आहे.

‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त व्हावा यासाठी राजकीय, सामाजिक व इतिहासप्रेमींकडून मागणी करण्यात येत होती. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही राज्य सरकारला पत्र लिहून हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली होती. पण भाजपप्रणीत केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटी कायद्यामुळे मनोरंजन कर रद्द झाला आहे. त्यामुळे चित्रपट करमुक्त कसा करायचा यावर ‘महाविकास आघाडी’ सरकारची पंचाईत झाली होती. पण त्यावर अखेर उपाय शोधून ‘तान्हाजी’ करमुक्त करण्यात आला आहे.

हे सु्द्धा वाचा

शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही

मुंबईत नाईट लाईफची मज्जा घ्या ‘या’ भागात !

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी