30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeमुंबईWorli Koliwada Children Die : वरळी कोळीवाडा समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू;...

Worli Koliwada Children Die : वरळी कोळीवाडा समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू; तर तीन मुलांवर उपचार सुरू

वरळी कोळीवाडा परिसरात समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास येथे पाच मुले खेळायला गेली होती, त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात वाहून जाऊ लागली. त्यातील 2 मुलांचा मृत्यू झाला असून 3 मुले बचावली आहेत.

वरळी कोळीवाडा परिसरात समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास येथे पाच मुले खेळायला गेली होती, त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात वाहून जाऊ लागली. त्यातील 2 मुलांचा मृत्यू झाला असून 3 मुले बचावली आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाचे जवानांना स्थानिकांनी यावेळी बचावकार्यात मदत करत पाच मुलांना समुद्रातून बाहेर काढले त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर 3 जण बचावले असून त्या तीघांना केइएम आणि हिंदुजा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

कार्तिक चौधरी (८) व सविता पाल (१२) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत तर कार्तिकी गौतम पाटील (१३), आर्यन चौधरी (१०) व ओम चंद्रजित पाल (१४) या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु असून कार्तिकी आणि आर्यन यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. आदित्य ठाकरे यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी हिंदुजा रुग्णालयात भेट देऊन तेथे उपचार घेणारे ओम, आर्यन यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच, या मुलांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

वरळी, कोळीवाडा येथील वाल्मिकी चौक परिसरात राहणारी दोन मुली व तीन मुले अशी पाच मुले शुक्रवारी दुपारी समुद्रात खेळायला गेली. यावेळी समुद्राला ओहोटी असल्यामुळे या मुलांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ही पाच ही मुले समुद्राच्या पाण्यात वाहून बुडू लागली, यावेळी या मुलांच्या आरडा ओरड्याने स्थानिकांनी मुलांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी स्थानिक रहिवाशांनी कार्तिकी, आर्यन आणि ओम या तीन मुलांना समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढले मात्र कार्तिक आणि सविता हे दोघे खोल समुद्रात वाहून गेल्यामुळे त्यांचा सोध लागला नाही.
हे सुद्धा वाचा :

PHOTO: हिवाळ्यात ‘या’ जीवघेण्या आजारांपासून सावध रहा!

Bharat Jodo Yatra : शिवाजी महाराजांना जिजाऊंनी मार्ग दाखवला म्हणून ते छत्रपती झाले; राहूल गांधींचे शेगावात प्रतिपादन

Shraddha Murder Case : आफताबची होणार नार्को टेस्ट; न्यायालयाने दिले आदेश

त्यानंतर थोड्या दूर अंतरावर नरिमन भाट येथे ही दोन मुले सापडली. त्यानंतर कार्तिकी हिला केईए रुग्णालयात तर इतर चौघा मुलांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी कार्तिक चौधरी आणि सविता पाल यांच्या शरिरात समुद्राचे पाणी गेल्याने श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. तर कार्तिकी पाटील आणि आर्यन चौधरी यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांची प्रकृती गंभीर असल्याची तर ओम पाल या मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी