33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeएज्युकेशनBomb Blast : शिक्षण संस्थेत बाॅम्ब हल्ला, 19 जणांनी गमावले प्राण

Bomb Blast : शिक्षण संस्थेत बाॅम्ब हल्ला, 19 जणांनी गमावले प्राण

काबूल शहरातील एका शिक्षण संस्ठेत आत्मघातकी स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात 19 जण मृत्यूमुखी पडले असून तब्बल 27 जण जखमी झाले आहेत. सदर हल्याची माहिती पोलिसांच्या हवाल्याने रॉयटर्सने दिली आहे.

अफगाणिस्तानच्या राजधानीतून एक धक्कातून वृत्त समोर आले आहे. काबूल शहरातील एका शिक्षण संस्ठेत आत्मघातकी स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात 19 जण मृत्यूमुखी पडले असून तब्बल 27 जण जखमी झाले आहेत. सदर हल्याची माहिती पोलिसांच्या हवाल्याने रॉयटर्सने दिली आहे. सदर आत्मघातकी हल्ला काल घडवण्यात आला असून या हल्ल्याने काबूल शहर पुर्णतः हादरून गेले आहे. बऱ्याचदा शिक्षण संस्थांना निशाणा बनवणाऱ्या दहशतवादी संघटनाकडून असे हल्ले वारंवार होत असल्याचे दिसून येत आहे. घडलेल्या या घटनेनंंतर जगभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर वृत्तामुळे सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरात एका शिक्षण संस्था गुरूवारी आत्मघातकी स्फोटाने हादरली. या स्फोटामध्ये 19 जणांनी आपले प्राण गमावले तर 27 जण जखमी झाले असल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा हल्ला एका शैक्षणिक संस्थेत झाल. खरंतर अफगाणिस्तानमध्ये साधारणपणे शुक्रवारी शाळा बंद असतात, परंतु त्यादिवशी या संस्थेत एक प्रवेश परीक्षा होत होती आणि या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.

हे सुद्धा वाचा…

Jasprit Bumrah Injury : बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला भारतीय संघात संधी; शमीला पुन्हा डावलले

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीसांकडे लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार, अजित पवारांचा टोला

Adhani : आदानींच्या कंपनीला मिळाले मोठे काम

रॉयटर्स पुढे म्हणाले, ‘नागरी लक्ष्यांवर हल्ला केल्याने शत्रूची अमानुष क्रूरता आणि नैतिक मानकांची कमतरता सिद्ध होते, या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही असे म्हटले आहे. दरम्यान, अफगाणस्थित मीडिया हाऊस टोलो न्यूजने सुद्धा ट्विटरवर याबाबत पोस्ट करत सदर घटनेची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये टोलो न्यूज म्हणते, प्राथमिक अहवालानुसार, काज शैक्षणिक केंद्रावर झालेल्या हल्ल्यात किमान 19 लोक मारले गेले आहेत.

काबुल सुरक्षा कमांडचे प्रवक्ते खालेद झद्रान यांनी सुद्धा या दुर्देवी घटनेबाबत सांगताना म्हणाले, विद्यार्थी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केंद्रात आले होते आणि त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. काबुल शहराच्या पश्चिम भागात हा स्फोट झाला असल्याचे समोर आले आहे. ज्या भागात हा स्फोट झाला त्या भागांत राहणाऱ्यांपैकी बरेच जण हजारा, इस्लामिक स्टेट या अतिरेकी गटाने यापूर्वी केलेल्या हल्ल्यांमध्ये लक्ष्य केलेले वांशिक अल्पसंख्याक आहेत. सदर हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्विकारली नसून या हल्ल्यामागचे कारण सुद्दा अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी