27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
HomeमुंबईKirit Somaiya : किरीट सोमय्यांवर बोगस पीएचडीचा आरोप; युवासेनेचे विद्यापीठात आंदोलन

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांवर बोगस पीएचडीचा आरोप; युवासेनेचे विद्यापीठात आंदोलन

भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी बोगसपद्धतीने मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली असल्याचा आरोप करत, त्यांच्या पीएचडी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत आज युवासेनेने सोमय्यांविरोधात युवासेनेचे मुंबई विद्यापीठ कालिना कॅम्पस इथील आंबेडकर भवन इथे धरणे आंदोलन केले. यावेळी युवासेनेने जोरदार घोषणाबाजी देखील केली.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बोगसपद्धतीने मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली असल्याचा आरोप करत, त्यांच्या पीएचडी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत आज युवासेनेने सोमय्यांविरोधात युवासेनेचे मुंबई विद्यापीठ कालिना कॅम्पस इथील आंबेडकर भवन इथे धरणे आंदोलन केले. यावेळी युवासेनेने जोरदार घोषणाबाजी देखील केली.

सोमय्या यांच्या प्रबंधाची प्रत देण्यास विद्यापीठ प्रशासन मागील काही महिन्यांपासून टाळाटाळ करत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. तसेच त्यांच्या पीएचडीच्या प्रबंधाची प्रत विद्यापीठात कोणत्या विभागात आहे हे देखील सांगण्यास विद्यापीठ प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. किरिट सोमय्या यांची पीएचडी बोगस असल्याचा आरोप करत युवासेनेने सोमय्यां यांच्या पीएचडीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावेळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या तसेच त्यांचा मुलगा नील सोमय्या यांची पोस्टर्स देखील झळकविली.

किरीट सोमय्या यांच्या बोगस डॉक्टरेट प्रकरणाची सत्यता बाहेर येण्यासाठी मागील सहा महिन्यापासून युवासेना प्रयत्न करीत असल्याची तक्रार करत याबाबत युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी कुलगुरू आणि कुलपतींना निवेदन दिल्याची ट्विट शिवसेना कम्युनिकेशन या अकाऊंटवरून केले आहे.
हे सुद्धा वाचा :
Eknath Shinde Prakash Ambedkar Meeting:एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या घरी; काय झाली चर्चा?

Video : औरंगाबादेतील छेडछाडीच्या घटनेत अल्पवयीन मुलगी जखमी

CM Eknath Shinde : नाशिक जिल्ह्यात शिंदे गटात पडणार फूट ?

भाजप नेते किरिट सोमस्या यांची पीएचडी पदवी बोगस असल्याचा आरोप युवासेनेने केला असून आता विद्यापीठ प्रशासन त्यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आधी देखील मुंबई विद्यापीठाने किरिट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याला 14 महिन्यात पीएचडी पदवी कशी काय दिली यावर जोरदार चर्चा सुरू होती, त्यातच आता किरिट सोमय्या यांची पदवी देखील बोगस असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.

विद्यापीठाकडून एखाद्या विद्यार्थ्याला पीएचडी पदवी प्रदान केल्यानंतर त्याची एक प्रत विद्यापीठातील प्रबंध विभाग, तसेच विद्यार्थी ज्या शाखेत ती पदवी प्राप्त करतो त्या विभागात अथवा ग्रंथालयात असणे आवश्यक असते, मात्र सोमय्या यांची प्रबंधाची प्रत विद्यापीठाच्या कोणत्या विभागात ठेवण्यात आली आहे याची माहिती विद्यापीठ प्रशासन देत नसल्याचा आरोप देखील युवासेनेने केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी