27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeराजकीयनाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भेटणार आहेत. त्यासाठी आज ते दिल्लीत दाखल झाले आहेत. नाना पटोले यांची भूमिका नेहमी आक्रमक राहिली आहे. गांधी परिवारावर टीका करण म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. जो थुंकेल त्याच्यावरच पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा खोचक टोला नाना पटोले यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला आहे (Nana Patole has slapped Shiv Sena leader Sanjay Raut).

नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांना ‘सामना’ दैनिकातून काँग्रेसच्या स्थितीबाबत केलेल्या भाष्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. नाना पटोले म्हणाले, “सामनावर मी कोणती ही प्रतिक्रिया देत नाही कारण मी सामना वाचत नाही. कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वारंवार त्याच त्याच गोष्टी सोबत राहून बोलले जात असेल तर त्याचा विचार आम्हाला एकदा करावा लागेल असे नाना पटोले म्हणाले (Nana Patole said that we have to think about it once).

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचा खोचक टोला

अरे भाई गुस्से की बात नही, मला पवारसाहेबांचे निमंत्रण नव्हते; नाना पटोले

यानंतर ते म्हणाले, आम्हला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. गांधी परिवारावर टीका करण म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. जो थुंकेल त्याच्यावरच पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा खोचक टोला नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

Nana Patole has slapped Shiv Sena leader Sanjay Raut
नाना पटोले आणि संजय राऊत

नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; मोदी सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे

Nana Patole’s Future As Maha Congress Chief In Limbo? Rahul Gandhi To Chair Key Meet Today

नेमके काय लिहिले आहे सामनामध्ये

काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? असा सवाल सामना दैनिकात करण्यात आला आहे. याशिवाय काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम असल्याचे आजच्या सामना अग्रलेखात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी आणि नाना पटोले यांची भेट

दरम्यान, नाना पटोले आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे सुद्धा बैठकीला उपस्थित असणार आहेत. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून, या बैठकीत संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. नाना पटोले यांच्या आज दोन बैठका आहेत. एक बैठक AICC ला नेत्यांबरोबर होती. पटोलेंनी AICC त पक्षाचे नेते मुकुल वासनिक यांची भेट घेतली आहे. ही बैठक झाली असून, नाना पटोले आता राहुल गांधी यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी