29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराष्ट्रीयAyodhya Diwali Celebration : 500 क्विंटल फुलांनी सजवली प्रभू श्रीरामांची नगरी! पंतप्रधान...

Ayodhya Diwali Celebration : 500 क्विंटल फुलांनी सजवली प्रभू श्रीरामांची नगरी! पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित

दिवाळी म्हणजे संपूर्ण भारताचा लाडका सण असतो. इतिहासाप्रमाणे दिवाळीत प्रभू श्रीराम आपला 9 वर्षांचा वनवास संपवल्यानंतर रावणाचा वध करून त्यांच्या घरी म्हणजेच अयोध्येला परतले होते.

दिवाळी म्हणजे संपूर्ण भारताचा लाडका सण असतो. इतिहासाप्रमाणे दिवाळीत प्रभू श्रीराम आपला 9 वर्षांचा वनवास संपवल्यानंतर रावणाचा वध करून त्यांच्या घरी म्हणजेच अयोध्येला परतले होते. धर्माने अधर्मावर मिळवलेल्या विजयाचा उत्साह म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी सर्वत्र दिवे प्रकाशित करत असतो. याच पार्शवभूमीवर अनेक ठिकाणी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अयोध्येत दीपोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पंतप्रधानांच्या आगमनाच्या तयारीसाठी संपूर्ण अयोध्या नववधूप्रमाणे सजली आहे. यावेळी लोकांमध्ये उत्साह आहे. प्रभू राम लल्लाचा परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे.

एकीकडे अयोध्येत रामाच्या मंदिराच्या उभारणीची तयारी जोरात सुरू आहे, तर दुसरीकडे दीपोत्सवानिमित्त अयोध्येला सजवण्यासाठी विशेष तयारी सुरू आहे. प्रभू राम लल्लाचा परिसर सुशोभित करण्यासाठी 500 क्विंटल फुलांची लागवड करण्यात आली आहे. रामजन्मभूमी मंदिराच्या गेटपासून एक किलोमीटर लांबीचा रस्ता दोन्ही बाजूंनी फुलांनी सजवण्यात येणार आहे. मुख्य गेटवर फुलांची सजावट करण्यात येत आहे. याशिवाय रामललाचे तात्पुरते मंदिर सुमारे 200 क्विंटल फुलांनी सजवण्यात येणार असून, त्यात विदेशी फुलांचाही वापर करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

Uddhav Thackeray : संभाजीनगरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

Anandacha Shidha : दिवाळीतील आनंदाचा शिधा आता ऑफलाईन मिळणार

Lohi Gram Panchayat : लोही ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना केले महत्वाचे आवाहन

देशी-विदेशी फुलेही खास सजावटीसाठी
प्रभू राम लल्लाच्या उभारणीच्या ठिकाणी फुलांची सजावट केली जात असून फुलांच्या रांगोळ्या काढल्या जात आहेत. साकेत महाविद्यालय ते दीपोत्सव स्थळापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरही फुलांची सजावट करण्यात येणार आहे. या महाविद्यालयाजवळ पंतप्रधान हेलिकॉप्टरने उतरणार आहेत. अयोध्येतील दीपोत्सवानिमित्त विशेष सजावटीसाठी परदेशातून अर्केट, अँथोनियम, लिली, अल्बेरा आणि कॅनेशनची फुले आयात करण्यात आली आहेत.

कोलकाताहून थायलंडला फुलं मागवली
फ्लॉवर डेकोरेटरने सांगितले की कोलकाता, दिल्ली, बनारस आणि थायलंड येथून फुले मागवली आहेत. संपूर्ण रामजन्मभूमी संकुलात 500 क्विंटल फुलांची सजावट करण्यात आली आहे. मुख्य रामजन्मभूमीच्या गेटपासून रामजन्मभूमीच्या गर्भगृहापर्यंत सजावट करण्यात येत असल्याचे फूल डेकोरेटरचे म्हणणे आहे. प्रभू रामललाच्या तात्पुरत्या मंदिरात 200 क्विंटल फुलांची सजावट करण्यात येणार असून, येथे विदेशी फुलांचाही वापर करण्यात येत आहे.

तीनशेहून अधिक कामगार रात्रंदिवस काम करतात
फुल डेकोरेटरने सांगितले की, पंतप्रधानांच्या आगमनाने आम्हालाही आनंद झाला असून प्रभू राम लल्लाचा परिसर फुलांनी सजवण्यासाठी 300 कामगार 5 दिवस अहोरात्र काम करत आहेत. सोमवारी (24 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजेपर्यंत रामललाचा दरबार फुलांनी सजवून सकाळी 9 वाजेपर्यंत रामजन्मभूमी संकुल एसपीजीकडे सोपवायचे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी