28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराष्ट्रीयसोशल मीडियावर जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींसाठी सरकारच्या गाईडलाईन्स

सोशल मीडियावर जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींसाठी सरकारच्या गाईडलाईन्स

जाहिरातीचे क्षेत्र आता पूर्वीप्रमाणे केवळ प्रिंट, टिव्ही, किंवा रेडिओसारख्या पारंपारिक माध्यमांपुरत्या मर्यादित राहिलेले नाही. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील मोठ्याप्रमाणात जाहिराती केल्या जात आहेत. सेलिब्रिटी (celebrities), सोशल मीडिया इंफ्लुएंसर्स (Social Media Influencer) देखील वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती करत असतात या माध्यमातून जाहिरातींचे प्रमाण देखील दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढत आहे. मात्र जाहिरातींच्या (advertising) माध्यमातून ग्राहकांची दिशाभूल होण्याचा धोका तर वाढला आहेच त्यासोबत समाज माध्यमांवर अशा व्यक्तींकडून अनुचित व्यापार पद्धतींचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे सरकारने अशा व्यक्तींसाठी आता जारी केलेल्या गाईडलाईन्स पाळाव्या लागणार आहेत. (celebrities to Government guidelines for advertising on social media)

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या (Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution) अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाने सोशल मीडिया इंफ्लुएंसर, सेलिब्रिटी यांच्यासाठी ‘एन्डोर्समेंट्स नो-हाऊ!’ म्हणजेच जाहिरातींविषयीच्या सविस्तर माहिती संदर्भात मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली. या व्यक्तींनी एखाद्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची जाहिरात करताना प्रेक्षकांची दिशाभूल करू नये तसेच ते ग्राहक संरक्षण कायदा आणि संबंधित नियम आणि गाईडलाईन्सचे पालन करतात की नाही यावर देखरेख ठेवणे हा यामागचा उद्देश आहे.

ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी ते जारी केले. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाची व्याप्ती जसजशी वाढत आहे, तसतसे सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इंफ्लुएंसर यांच्याबरोबरच व्हर्चुअल पद्धतीने प्रभावित करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे यामुळे जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांची दिशाभूल होण्याचा धोका तर वाढला आहेच त्यासोबत सोशल मीडियावर अशा व्यक्तींकडून गैरव्यापार पद्धतींचं प्रमाण देखील वाढलं आहे.

त्यामुळे “एन्डोर्समेंट्स नो-हाऊ!” व्दारे काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. जाहिरातींमध्ये प्रोडक्ट किंवा कोणत्याही सर्व्हिसबद्दलची माहिती ठळकपणे देणे गरजेची असणार आहे. जे सेलिब्रिटी, सोशल मीडिया इंफ्लुएंसर सोशल मीडियावर कोणत्याही प्रोडक्ट अथवा सर्व्हिसची जाहिरात करतात त्याबाबतची त्यांची व्यवहारिक भूमिका सांगणे आवश्यक राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

पुण्यात पार पडलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनधिकृत : कुस्तीसम्राट अस्लम काझी

बारामतीच्या चांडाळ चौकडीच्या करामती झाल्या वर्ल्डफेमस!

आता महाराष्ट्रासाठी सर्वच दरवाजे खुले, जातीनिहाय जनगणनेला सरकारने होकार द्यावा!

जाहिराती सोप्या, स्पष्ट भाषेत केल्या पाहिजेत आणि “जाहिरात,” “प्रायोजित,” किंवा “सशुल्क जाहिरात” यासारख्या संज्ञा वापरल्या जाव्यात. जाहिरात करताना अशा कोणत्याही उत्पादन किंवा सेवेचे समर्थन करू नये ज्यामध्ये त्यांनी योग्य परीक्षण केलेलं नाही किंवा त्यांनी ते वैयक्तिकरित्या वापरलेले किंवा अनुभवलेले नाही. तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर जाहिरात कायद्याने बंदी असल्याचे देखील म्हटले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी