29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी २२ जानेवारी दिवशी 'या' कार्यालयांना असणार अर्धा दिवस सुट्टी

राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी २२ जानेवारी दिवशी ‘या’ कार्यालयांना असणार अर्धा दिवस सुट्टी

२२ जानेवारी दिवशी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशातील अनेकांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. केवळ आयोध्या नाही तर देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी देशवासियांना आवाहन केलं आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमुळे राम मंदिरावरून अनेक वक्तव्य केली जात आहेत. त्यामध्ये राम मंदिराचे थेट राजकीय संबंध असल्याचा विरोधकांनी दावा केला. यामुळे आता या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधीच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. अशातच आता या दिवशी एक नवीन आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. या दिवशी अनेकांना अर्धा दिवस सुट्टी असणार असल्याची माहिती भाजपने दिली आहे.

केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता

‘संपूर्ण देश राममय झालाय. याच धर्तीवर २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पवित्र सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या कार्यालयांना अर्ध्या दिवसाची म्हणजे दुपारी २. ३० पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व रामभक्तांना प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम याची देही याची डोळा पाहता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या अभूतपूर्व सोहळ्याचे आपणही साक्षीदार होवूयात’. अशी माहिती भाजपने ट्विटर (x) हॅंडेलवरून दिली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये सार्वजनिक सुट्टी

प्रभू श्रीरामाची जन्मभूमी ही आयोध्या आहे. आयोध्या ही राम जन्मभूमी उत्तरप्रदेश राज्यामध्ये आहे. २२ जानेवारी दिवशी रामलल्लाची प्रतिष्ठापणा आहे. याच दिवशी उत्तरप्रदेशमध्ये सार्वजनिक सुट्टी असणार आहे.

‘या’ ठिकाणी ड्राय डे आणि दारूची दुकानं बंद

उत्तरप्रदेशमधील नोएडा, ग्रेटर नोएडा, आयोध्येसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना सुट्टी असणार आहे. २२ जानेवारी या दिवशी सर्वच दारूची दुकानं बंद राहणार असून ड्राय डे म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी