29 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeराजकीयप्रकाश आंबेडकरांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेस जाण्यास दिला नकार, कारण आलं समोर

प्रकाश आंबेडकरांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेस जाण्यास दिला नकार, कारण आलं समोर

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस आता जवळ येत आहे. २२ जानेवारी दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळा असणार आहे. काही दिवसांआधी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक नेत्यांना निमंत्रण नव्हतं. मात्र त्यानंतर नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं मात्र आता राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला राजकीय वलय प्राप्त होत असल्याचं विरोधी नेत्यांनी दावा केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्राणप्रतिष्ठेसाठी नकार दिला आहे. ते नंतर जाणार असल्याचं म्हणाले आहेत. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण आलं मात्र ते देखील प्राणप्रतिष्ठेसाठी जाणार नसल्याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलं आहे.

याआधी राजकीय नेत्यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. मात्र आता त्यांना निमंत्रण मिळूनही ते राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकरांनी देखील याबाबत उद्घाटन सोहळ्याला न जाण्याचं कारण सांगितलं आहे. राम मंदिराचा मुद्दा राजकीय बनवला जात असल्याचं ते म्हणाले आहेत. यावरूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी याबाबत एक महत्त्वाचा इशारा पटवून दिला होता.  महत्त्वाचा इशारा लक्षात घेऊन ते आयोध्येला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जाणार नसल्याची माहिती समोर आली. त्यांनी पत्रामध्ये ते नमूद केलं आहे.

हे ही वाचा

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पुणे ते आयोध्या ट्रेनची सुविधा

गोरेगाव फिल्मसिटी, राष्ट्रीय उद्यान होणार चमकदार

शिक्षणाला वय नसतं, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानं ५० व्या वर्षी मिळवली पदव्युत्तर पदवी

काय लिहिलं पत्रामध्ये?

‘प्रिय श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट अयोध्या,

विषय : श्री राम जन्मभूमी अयोध्या प्राणप्रतिष्ठा समारंभ आमंत्रण पत्र

श्री राम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा आमंत्रणसाठी तुमचे आभार.

कथित सोहळ्यात मी सहभागी होणार नाही. हजर न राहण्याचं कारण हे आहे की, भाजप आणि आरएसएसने हा कार्यक्रम हडप केला आहे. एक धार्मिक सोहळा निवडणुकीतील फायद्यासाठी एक राजकीय अभियान बनला आहे.

माझे पणजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सावध केले होते की, ‘जर राजकीय पक्षांनी धर्म, पंथाला देशापेक्षा जास्त प्राधान्य दिलं, तर आपलं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल. आणि यावेळी कदाचित आपण तो कायमस्वरूपी गमावून बसू.” आज ही भीती खरी ठरली आहे. धर्म, पंथाला देशापेक्षा वर ठेवणारे भाजप-आरएसएस त्यांच्या राजकीय फायद्यासाठी हा कार्यक्रम ताब्यात घेऊन बसली आहे.
जय फुले… जय सावित्री… जय शाहू… जय भीम’.

‘देशापेक्षा धर्माला सरकारचे प्राधान्य’

‘देशापेक्षा धर्माला सरकारचे प्राधान्य असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. देशाचे झुकते माप हे देशाहून धर्माकडे अधिक आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे मोदी सरकारचे प्राधान्य हे देशापेक्षा धर्माकडे आहे’.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी