26 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीयराजू शेट्टी म्हणतात अनेक ऑफर आल्या तरीही मी हुरळून जाणारा नाही

राजू शेट्टी म्हणतात अनेक ऑफर आल्या तरीही मी हुरळून जाणारा नाही

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना अनेक ठिकाणाहून ऑफर येत असल्याच्या चर्चा आहेत. यावर आता राजू शेट्टी यांनी परभणीमध्ये बोलत असताना प्रतिक्रिया दिली आहे. थेट नाही मात्र अनेकदा मध्यस्थांकडून या मंत्र्याला भेटून केंद्रीय मंत्र्यांशी जवळीकता करावी. अशा अनेक प्रकारचे निरोप मला येत आहेत. मात्र मला कितीही मोठी ऑफर आली तरीही हुरळून जाणारा नाही, असं म्हणत राजू शेट्टी यांनी परभणीमध्ये बोलत असताना लोकसभा निवडणुकीच्या आधी बोलत असताना वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले राजू शेट्टी?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भाजपशी हातमिळवणी केली असल्याचं बोललं जात आहे. यावर बोलत असताना राजू शेट्टी यांनी आरोप करणाऱ्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. ‘भाजपसोबत जाण्याच्या बातम्या पेरल्या जात आहे. प्रत्यक्षपणे माझ्यासोबत अशी चर्चा झाली नाही. अप्रत्यक्षपणे काही लोकं दिल्लीला येणार असल्याचा आग्रह धरत आहेत. आम्हाला यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. जरी भाजपकडून अप्रत्यक्षपणे विचारणा होत असली तर आपण हुरळून जाणार नाही. आमच्या कार्यकारिणींने निर्णय घेतला’, असल्याचं म्हटलं गेलं आहे.

हे ही वाचा

राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी २२ जानेवारी दिवशी ‘या’ कार्यालयांना असणार अर्धा दिवस सुट्टी

प्रकाश आंबेडकरांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेस जाण्यास दिला नकार, कारण आलं समोर

गोरेगाव फिल्मसिटी, राष्ट्रीय उद्यान होणार चमकदार

राजू शेट्टी कोणासोबत जाणार?

राजू शेट्टी अनेक दिवसांपासून काही नेतेमंडळींशी भेटत आहेत. यामुळे राजू शेट्टी हे आता नेमकं महाविकास आघाडीमध्ये जाणार की भाजपमध्ये जाणार? यावर ना महाविकास आघाडी ना भाजपमध्ये जाणार असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यासाठी ठाम असणार आहे.

‘आघाड्यांच्या जाहीरनाम्यांशी लोकं प्रामाणिक नाहीत’

‘आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या चळवळींसाठी काम करणार आहे. अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागा सुटल्याची चर्चा होती. मात्र आम्ही कोणत्याच आघाडीमध्ये जाणार नाही. कारण आघाड्यांच्या जाहीरनाम्यांशी लोकं प्रामाणिक नाहीत. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो’, असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी